6.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
HomeTop Five Newsदेशाच्या राजधानीत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट

देशाच्या राजधानीत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट

8 जणांचा मृत्यू, दिल्लीसह मुंबईत हाय अलर्ट जारी

संपूर्ण देशाला हादरवणारी घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे. घटनेमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकच्या बाहेर पार्किंगमध्ये हा मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झालाय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण पोलिसांनी आज फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केल्यानंतर आज संध्याकाळी दिल्लीत स्फोट झाला आहे. त्यामुळे या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का? ते अद्याप समजू शकलेलं नाही. एका इको व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी ही स्फोटाची घटना घडली. स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली. या आगीत अनेक गाड्या आगीच्या भक्षस्थानी गेल्या. या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हा स्फोट खूप भीषण होता. परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहे. एवढंच नाही तर काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव अस्ताव्यस्थ पडलेली बघायला मिळत आहेत. या घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेमागे नमकं कारण काय आहे? हा दहशतवादी हल्ला होता की दुसरं काही होतं? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. घटनास्थळी डॉग स्कॉडच्या मदतीने तपास केला जात आहे.

24 जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
या स्फोटात आतापर्यंत 24 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने एलएनजीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा स्फोट इतका मोठा होता की, त्याच्या आवाजाने परिसरातील दुकानांची काचे फुटली. तसेच अनेक वाहनांच्या देखील काचा फुटल्या होत्या. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटना पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी मोठा गोंधळ उडालेला होता. अखेर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तातडीने परिस्थिवर नियंत्रण मिळवले. संबंधित परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, परिसराती घरे देखील हादरले आहेत. आता पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
6.1 ° C
6.1 °
6.1 °
93 %
2.1kmh
0 %
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
21 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!