34.1 C
New Delhi
Sunday, April 12, 2026
HomeTop Five Newsपिंपरी-चिंचवड महानगरपालिकाचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प शनिवारी सादर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प शनिवारी सादर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी (दि. २८) सादर करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे स्थायी समितीपुढे हा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

स्थायी समितीच्या नव्या सभापतींची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी होणाऱ्या पहिल्या विशेष सभेत अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असल्याने नियमांनुसार सभापती निवड आणि विशेष सभा एकाच दिवशी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राजवट लागू होती. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर महापौर व उपमहापौर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून आता स्थायी समितीची स्थापना हा पुढील महत्त्वाचा टप्पा आहे. स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीनंतर सभापतीपदाची निवडणूक होत आहे.

सभापती निवड प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प सादरीकरणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, कायदेशीर मुदतीत अर्थसंकल्प मांडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे.

आगामी आर्थिक वर्षासाठी विकासकामे, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तरतुदींवर सर्वांचे लक्ष लागले असून शनिवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून शहराच्या विकासाचा आराखडा स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.1 ° C
34.1 °
34.1 °
21 %
5.1kmh
0 %
Sun
35 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
40 °
Thu
40 °

Most Popular

Recent Comments