13.1 C
New Delhi
Sunday, February 1, 2026
HomeTop Five Newsजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत मोठा बदल

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत मोठा बदल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उर्वरित कार्यक्रमात महत्त्वाचे बदल केले आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे.

दुखवट्यामुळे वेळापत्रकात बदल –

राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी या निवडणुकांचा मूळ कार्यक्रम जाहीर केला होता. उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे आणि चिन्ह वाटप यांसारख्या प्रक्रिया आधीच पूर्ण झाल्या आहेत.

मात्र, २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्र्यांचे अपघाती निधन झाल्याने २८ ते ३० जानेवारी दरम्यान राज्यात दुखवटा पाळला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीनंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली असली, तरी सद्यस्थितीचा विचार करून आयोगाने दोन दिवसांचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रचारासाठी अतिरिक्त वेळ –

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतदानाचा दिवस दोन दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे. परिणामी, उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी ५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंतची मुदत मिळणार आहे.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होताच संबंधित निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
13.1 ° C
13.1 °
13.1 °
94 %
2.6kmh
20 %
Sat
15 °
Sun
23 °
Mon
24 °
Tue
24 °
Wed
25 °

Most Popular

Recent Comments