6.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
HomeTop Five Newsस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण जाहीर

६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, २३ एसटी/एससीसाठी राखीव

ELECTION NEWS- मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्यापूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यामुळे निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.

आरक्षणाची घोषणा टप्प्या टप्प्याने केली जाणार असून, मिळालेल्या माहितीनुसार ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, ज्यापैकी ३४ नगरपरिषदा महिलांसाठी आहेत. तसेच, २३ नगरपरिषदा अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव ठेवल्या आहेत.

ओबीसी महिलांसाठी राखीव नगरपरिषदा यादीत भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौंड, हिंगोली, फुलगाव, मुरूड जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर-नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोडा, कुर्डुवाडी, धामणगाव रेल्वे, वरोरा इत्यादींचा समावेश आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला आरक्षणासाठी वणी, भडगाव, पिंपळनेर, उमरी, यवतमाळ, शेंदूरजनाघाट या नगरपरिषदा राखीव ठेवल्या आहेत.अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षणासाठी शिरोळ, देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, भुसावळ, घुगुस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैंदरगी, डिगदोहदेवी, डिग्रस, अकलूज, परतूर, बीड यांचा समावेश आहे.

यासोबतच, खुला महिला प्रवर्गासाठी परळी वैजनाथ, मुखेड, आंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर(कोल्हापूर), मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदुरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनुरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगूड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदुररेल्वे, चांदुरबाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलूस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदिरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगांव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग या नगरपरिषदा राखीव करण्यात आल्या आहेत.

राज्यातील निवडणूक प्रक्रिया आता वेगाने सुरु झाली असून, या आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांचा प्रारंभ झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
6.1 ° C
6.1 °
6.1 °
93 %
0kmh
40 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!