38 C
New Delhi
Thursday, June 25, 2026
HomeTop Five Newsसीईटी २०२६ साठी नवे नियम; आधारसोबत ‘अपार आयडी’ अनिवार्य

सीईटी २०२६ साठी नवे नियम; आधारसोबत ‘अपार आयडी’ अनिवार्य

पुणे – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६ पासून सीईटी परीक्षेसाठी नवे नियम लागू केले आहेत. यानुसार, आता केवळ आधार कार्ड पुरेसे नसून उमेदवारांकडे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (APAR – अपार आयडी) असणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षा २०२६ पासून वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. या बदलाच्या पार्श्वभूमीवर सीईटीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आधीच करून ठेवण्याचे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६ साठीच्या सीईटी परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख (दहावीच्या प्रमाणपत्रानुसार), पत्ता, वडिलांचे नाव, अद्ययावत छायाचित्र तसेच आधारशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय असणे बंधनकारक आहे.

आधारसोबतच उमेदवारांनी अपार आयडी तयार करून ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. २०२६ पासून सीईटीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अपार आयडी सक्तीचा असेल.

दिव्यांग उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र किंवा युनिक दिव्यांग आयडी (UDID) कार्ड अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे दिव्यांग उमेदवारांनी युडीआयडी कार्ड आधीच प्राप्त करून ठेवावे, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

आधार कार्डवरील सर्व माहिती दहावीच्या प्रमाणपत्राशी जुळणारी असावी, अन्यथा अर्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आधार व अपार आयडीची माहिती तपासून अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
38 ° C
38 °
38 °
30 %
5kmh
1 %
Thu
38 °
Fri
43 °
Sat
45 °
Sun
44 °
Mon
43 °

Most Popular

Recent Comments