41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
HomeTop Five Newsस्वरातून स्वप्नांकडे भरारी..!

स्वरातून स्वप्नांकडे भरारी..!

🎶 मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावपूर्ण आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी सावनी रवींद्र आता नव्या भूमिकेतून रसिकांसमोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेल्या सावनीने गायक म्हणून मिळवलेल्या यशानंतर आता स्वतःचं म्युझिक लेबल सुरू करत संगीताच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.‘सावनी रेकॉर्डझ्’ या नावाने तिच्या म्युझिक लेबलची घोषणा एका विशेष सोहळ्यात करण्यात आली. या लेबलचं उद्घाटन ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी अवधूत गुप्ते, अभिजीत सावंत, कौशल इनामदार, नंदेश उमप यांसारख्या संगीत क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.या नव्या लेबलअंतर्गत सावनीचं पहिलं गाणं ‘मुजरा शिवबाला’ही प्रदर्शित करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणाऱ्या या गीताला वैभव देशमुख यांचे प्रभावी शब्द आणि विजय नारायण गवंडे यांचं दमदार संगीत लाभलं आहे.

विशेष म्हणजे या गाण्यात सावनीने केवळ गायनच नाही, तर लावणी सादरीकरणातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.आजवर सावनीने ‘सावनी ओरिजिनल्स’सारख्या उपक्रमांद्वारे विविध भाषांमध्ये आणि शैलींमध्ये प्रयोग करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटसंगीतासोबतच नव्या कल्पना साकारण्याची तिची धडपड कायम राहिली आहे.आपल्या नव्या प्रवासाबद्दल सावनी सांगते की, संगीत हेच तिचं बळ असून त्याच्याच आधारावर ती एक स्वतंत्र व्यासपीठ उभं करत आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ हे केवळ लेबल नसून एक स्वप्न आहे, जिथे दर्जेदार, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारं संगीत साकारेल. नवोदित कलाकारांना संधी देत काहीतरी वेगळं आणि अभिमानास्पद घडवण्याचा तिचा मानस आहे.

यावेळी सुरेश वाडकर यांनीही सावनीच्या ‘मुजरा शिवबाला’ या गाण्याचं कौतुक करत लावणीची पारंपरिक ताकद आणि ठसक्याचं सुंदर सादरीकरण असल्याचं मत व्यक्त केलं. त्यांनी सावनीच्या नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा देत तिच्या संगीत प्रवासाला उज्ज्वल भवितव्याची कामना केली.‘सावनी रेकॉर्डझ्’चा लोगोही विशेष लक्षवेधी आहे. ‘चंद्रकोर’ आणि व्हिनाइल रेकॉर्ड यांचा संगम असलेला हा लोगो परंपरा, स्त्रीशक्ती आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ दर्शवतो. मराठी स्त्री गायिकांमध्ये स्वतःचं म्युझिक लेबल उभारण्याचं धाडस कमी जणी करत असताना सावनी रवींद्रने उचललेलं हे पाऊल नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments