मंचर : धामणी(तालुका आंबेगांव) येथील कुलस्वामी खंडोबा मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.चैञ पौर्णिमेच्या मुहर्तावर गुरुवारी (२ एप्रिल२६) शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले. चैञी पौर्णिमेच्या निमित्ताने खंडेरायाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगावर चैञ महिण्याच्या वसंत ॠतुतील दुसरी वासंतिक चंदनउटी साकारण्यात आली.खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या व स्वयंभू सप्तशिवलिंगावर साकारलेल्या चंदनउटीचे मनमोहक रुप पाहाण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.तत्पूर्वी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद झाला.त्यानंतर पहाटे पांच वाजता डाॅ पाटीलबुवा जाधव.पा. व प्रमिला जाधव. सोमनाथ जाधव.व रोहीणी जाधव.दिपक जाधव व निलम जाधव.संतोष प्रभाकर बढेकर. व छाया बढेकर.लक्ष्मण जाधव.पा व कल्पना जाधव.दत्ताञय गाढवे व अनिता गाढवे.सुनिल पांडुरंग जाधव व माधुरी जाधव.बाळासाहेब तुकाराम बोर्हाडे व प्रतिभा बोर्हाडे.

या आठ जोडप्याच्या हस्ते वसंत पूजा व दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला.खंडेराय.म्हाळसाई. बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार व सुंगधी फुलांचे हार घालण्यात आल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी प्रभाकर भगत.दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.धोंडीबा भगत.नामदेव भगत. राहूल भगत.पांडुरंग भगत.अनिरुध्द वाळूंज. यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर.व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित चंदनाच्या उटीचा लेप देण्यात आला.त्यानंतर खंडेरायाला पुरणपोळीचा व भजी कुरडईचा नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.

सुवासिक चंदनाचे लेपन करत असताना मंदिराच्या सभामंडपात देवाच्या उटीचे अभंग भक्तीमय वातावरणात गायले जात होते. तर मंदिराच्या आवारात समस्त पंचरास मंडळीच्या पारंपारिक वाद्याच्या सनईतून मंगलमय स्वरात भक्तिमय भैरवी गायल्या जात होत्या वसंत ॠतुच्या उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात झेंडू.गुलाब.अष्टरच्या फुलांची सजावट पोंदेवाडीचे बाळशिराम साळगट यांनी तर धामणीचे युवराज बढेकर यांनी मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात आकर्षक विद्युत रोषणाई केलेली होती.मंदिराचे आवारात व सभोवताली भल्या पहाटे महेश्वरी आळेकर यांनी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या.पहाटे मंदिरात स्वयंभू शिवलिंगाला चंदनाची उटी लेपन केल्यानंतर उपस्थित भाविकांच्या कपाळाला चंदनउटी व भंडारा लावण्यात आला.वासंतिक चंदनउटी सोहळ्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.वासंतिक चंदनाच्या उटीने उन्हाचा दाह आणि हरीनामाच्या भजनाने आत्मीक शितलता निर्माण होण्यास मदत होते असे यावेळी भाविकांनी सांगितले.चैञ पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी पुणे.नगर.नाशिक मुंबई.भोसरी.पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील भाविक सहकुटुंब आलेले होते.मंदिराच्या जागरण मंडपात पांच नामाची जागरणाचे घट मांडून वाघे व वीर मंडळी जागरणे करताना दिसत होती बहुसंख्य भाविक चारचाकी व दुचाकी वाहनाने येत होते.मंदिराच्या बाहेर तळीभंडार फुल पेढे विक्रीची दुकाने थाटलेली होती. कडक उन्हाच्या तिव्रतेमुळे दुपारनंतर भाविकांची तुरळक ये—जा सुरु होती.चैञ पौर्णिमा व हनुमान जयंती निमित्ताने गुरुवारी सकाळपासून घरोघरी देवघरातील खंडोबा म्हाळसाईच्या टाकाच्या पूजेची व पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरु झाल्याचे पाहावयास मिळाले यावेळी महिलांनी पहाटेपासून घरासमोर दारात सडा टाकून रांगोळ्या काढलेल्या होत्या. २०२४ पासून धामणी ग्रामस्थांनी ६६वर्षानंतर खंडोबा देवस्थान मंदिरात चंदनउटी लेपन सोहळा सुरु केला असून गुढीपाडवा.चैञ पौर्णिमा.व अक्षयतृतीया या तीन सणांच्या दिवशी चंदनउटी सोहळा खंडोबा मंदिरात होतो असे देवस्थानचे सेवेकरी दादाभाऊ भगत यांनी यावेळी सांगितले.धामणीच्या पेठेतील पुरातन मारुती मंदिरात पहाटे अजित बोर्हाडे व रेश्मा बोर्हाडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.त्यानंतर मंदिरात सावता भजनी मंडळाचे भजन झाले.मारुतीच्या दर्शनासाठी व गुळाची शेरणी वाटण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.


