26 C
New Delhi
Thursday, July 9, 2026
HomeTop Five Newsपीएमपी बसमधील चोरी व महिला विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

पीएमपी बसमधील चोरी व महिला विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

सर्व बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

pmpl news! पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)च्या बसमध्ये चोरी तसेच महिला विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी सर्व बसमध्ये (pmpl बस)सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सुरवसे-पाटील यांनी पीएमपी प्रशासनाकडे निवेदन दिले असून, महिला प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी सर्व बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये अद्याप सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बसमधील चोरी किंवा विनयभंगाच्या घटनांतील आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी कठीण ठरत आहे. (Cit Bus) विशेषतः गर्दीच्या वेळी महिलांशी गैरवर्तनाच्या घटना घडत असून, पुराव्याअभावी अनेक प्रकरणे अनुत्तरित राहतात.

सध्या पीएमपीच्या वातानुकूलित तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत. मात्र जुन्या बसमध्ये ही सुविधा नसल्याने प्रवाशांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जुन्या बसमध्येही तातडीने सीसीटीव्ही बसविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

दरम्यान, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी जुन्या बसमध्येही सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ज्या बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आहे, त्यावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरात सार्वजनिक वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
heavy intensity rain
26 ° C
26 °
26 °
87 %
6.1kmh
100 %
Thu
27 °
Fri
35 °
Sat
40 °
Sun
41 °
Mon
42 °

Most Popular

Recent Comments