‘आयईईई इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबिलिटी टेक्नॉलॉजी फॉर ह्यूमिनिटी अॅण्ड स्मार्ट वर्ल्ड’
पुणे, ३० ऑगस्टः तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक नवनिर्मिती, भागीदारी आणि विश्वशांती या तत्वांवर आधारित ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग विभागाच्या वतीने ‘आयईईई इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबिलिटी टेक्नॉलॉजी फॉर ह्यूमिनिटी अॅण्ड स्मार्ट वर्ल्ड’ (एचएसडब्ल्यू टेक-२०२५) या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २ ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. ही परिषद कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्वामी विवेकानंद सभागृहात होईल. या परिषदेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे डॉ. भरत चौधरी व डॉ. पारूल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सशक्त व बुद्धिमान विश्व निर्मितीसाठी शाश्वत तंत्रज्ञानाचे स्मार्ट नवोपक्रमांचे एकत्रीकरण, व्यवसाय व समाज पर्यावरणीय उद्दिष्टांशी जुळतांना दीर्घकालीन यशासाठी जबाबदार तंत्रज्ञानाचा वापर करणे, दैनंदिन जीवनात स्मार्ट प्रणालींचा समावेश करून कार्यक्षमतेला वृद्धिगत करणे आणि पर्यावरणीय घातक परिणाम कमी करून नव्या पिढीसाठी शाश्वत भविष्य घडविणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्टये आहे.
ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ, मंगळवार २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वा. होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच आयबीएमच्या लीड क्लायंट पार्टर्नचे अभिजित अटाळे, थेल्स रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचे डॉ. सुब्राकांती दास, ब्रॉडकॉमचे वरिष्ठ अभियंता व्यवस्थापक सुनिल खराटे हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
आयोजित परिषदेत ‘ग्रीन कम्युनिकेशन अँड नेटवर्क्स’, ‘सेमीकंडक्टर अँड चिप डिझाइन’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड कम्प्युटिंग’, ‘ऑटोमेशन अँड अनमॅन्ड सिस्टीम्स’, ‘ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी’ व ‘ मानव आणि आरोग्यसेवेसाठी अभियांत्रिकी’ या विषयावर
चर्चा होणार आहे.
यावेळी क्वालकॉम अमेरिका येथील वरिष्ठ अभियंता सई जाधव, शिन्डलर इलेक्ट्रिकचे संशोधन आणि विकास संचालक श्रीपाद काळे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या बरोबरच अन्य क्षेत्रातील मान्यवर वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडतील.
परिषदेचा समारोप गुरूवार ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वा. होणार आहे. यावेळी ग्लोबल डिलिवरीचे उपाध्यक्ष निखिल दातार व मित्सुबिशी इलेक्ट्रिक प्रा.लि.चे अतिरिक्त उपाध्यक्ष अनिल देशपांडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे व सीएओ प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांची प्रमुख उपस्थित असेल.
आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुनिल सोमाणी, डॉ. साकेत येवलेकर, डॉ. रघुनाथ भदाडे, डॉ. पुजा गुंडेवार, डॉ. अंजली आसखेडकर आणि डॉ. चेतन खडसे हे उपस्थित होते.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे