20.1 C
New Delhi
Wednesday, November 5, 2025
HomeTop Five Newsनरेंद्रभाई मोदी हे अलौकिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जागतिक महासत्ता...

नरेंद्रभाई मोदी हे अलौकिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जागतिक महासत्ता बनेल!

माधवराव भांडारी व धीरजजी घाटे यांचे प्रतिपादन...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्कंडेय यज्ञ संपन्न – संदीप खर्डेकर, विश्वजित देशपांडे यांचे संयोजन.

“क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना आरोग्य किट भेट”.

नरेंद्रभाई मोदी हे अलौकिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जागतिक महासत्ता बनेल, त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांनी हाती घेतलेल्या कार्याला यश प्राप्त होवो अश्या शुभेच्छा भाजपा चे वरिष्ठ नेते माधवराव भांडारी व पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांनी दिल्या.
नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताची आता सगळं जग दखल घेत असून भारत हा महासत्ता बनेपर्यंत पंतप्रधान पदी मोदीजी रहावेत अशी कामना देखील माधवराव भांडारी यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोथरूड च्या मृत्युंजयेश्वर मंदिरात मार्कंडेय यज्ञ व सप्तचिरंजीव पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.ह्या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वजित देशपांडे व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.
यावेळी भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, युवा मोर्चा चे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे,जयंत भावे, माधुरीताई सहस्त्रबुद्धे,प्रशांतजी हरसूले, शहर उपाध्यक्ष विठ्ठल बराटे,पुणे जिल्हा नियोजन समिती चे सदस्य डॉ. संदीप बुटाला, सुयश गोडबोले,बापूसाहेब मेंगडे,गिरीश खत्री,प्रभाग 29 च्या अध्यक्ष एड. प्राची बगाटे,राजेंद्र येडे, शंतनू खिलारे, शरद लेले,गौरी करंजकर,कल्पना पुरंदरे,जयश्री तलेसरा, पूनम कारखानीस,अपर्णा लोणारे,छाया सोनावणे, शुभांगी सुदामे, जागृती कणेकर, कल्याणी खर्डेकर, डॉ. मृणाल इनामदार, वृषाली शेकदार,सुलभा जगताप,दिलीप उंबरकर,दीपक पवार,प्रतीक खर्डेकर,सुमित दिकोंडा, सतीश कोंडाळकर, बाळासाहेब धनवे, योगेश करपे,स्वाती मानकर,विवेक विप्रदास,सुनील कटारिया,सुभाष झानपुरे,मंगल शिंदे,रत्ना कटारिया,भाग्यश्री साठे,मंगल जाधव,श्रीपाद सुभेदार,मालुसरे, जगदीश डिंगरे, इ मान्यवर उपस्थित होते.
हा यज्ञ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना आरोग्यसंपन्नता लाभो यासाठी करण्यात आल्याचे संदीप खर्डेकर व विश्वजित देशपांडे यांनी स्पष्ट केले. पूर्णाहुती च्या वेळी उपस्थित असलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना देखील ह्या यज्ञाचा लाभ होईलच पण सकल समाजाला यातून आरोग्यसंपन्नता लाभावी अशी प्रार्थना असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी माधवराव भांडारी, मंजुश्री खर्डेकर,सुशील मेंगडे, दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विविध संस्थांना आरोग्य किट चे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने देवदेवेश्वर संस्थान चे रमेशजी भागवत, जगन्नाथजी लडकत, अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, विजय शेकदार, परशुराम हिंदू सेवा संघाचे हृषीकेश सुमंत,स्वामी आंगण वृद्धाश्रमाच्या आनंदी जोशी,कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे गिरीश शेवडे ,महाराष्ट्र ब्राह्मण महासभा मयुरेश अरगडे, चैतन्य जोशी,तुषार निंबर्गी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राचे मकरंद माणकिकर, आम्ही सारे ब्राह्मण चे भालचंद्र कुलकर्णी,श्री राजस्थानी छ:न्याती विप्र मंडळ चे मनोज पंचारिया,यांना आरोग्य किट ज्यात उच्च रक्तदाब तपासणी यंत्र , शुगर तपासणी यंत्र,प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आली.
अभिनव पद्धतीने नरेंद्रभाई मोदी यांना शुभेच्छा दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
ह्या यज्ञाचे पौरोहित्य ऋषिकेश रत्नाकर सुमंत,चैतन्य दिगंबर जोशी,योगेश काजरेकर,महेश नऱ्हेकर,प्रशांत कुलकर्णी यांनी केले. मंत्रोच्चाराने अत्यंत प्रसन्न वातावरणात हा यज्ञ पार पडला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
88 %
1.5kmh
75 %
Wed
31 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!