26.2 C
New Delhi
Friday, October 10, 2025
HomeTop Five Newsआधार, पॅन आणि ड्रायव्हिंग लायसन्स एकाच ठिकाणी अपडेट करा, ३ दिवसांत तुमची...

आधार, पॅन आणि ड्रायव्हिंग लायसन्स एकाच ठिकाणी अपडेट करा, ३ दिवसांत तुमची कामे होतील सोपी

केंद्र सरकारचा नवा पोर्टल लवकरच सुरु होणार

तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्समध्ये काही त्रुटी असल्यास किंवा अपडेट्स करायचे असल्यास, आता तुम्हाला वेगवेगळ्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकार लवकरच एक अशी डिजिटल प्रणाली सुरू करणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही या सर्व महत्त्वाच्या ओळखपत्रांची सुधारणा आणि अपडेट एकाच ठिकाणी करू शकता.

या नवीन डिजिटल ओळख प्रणालीमुळे तुम्हाला तुमचे नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलायचे असल्यास, हे सर्व एकाच पोर्टलवर करून ३ दिवसांच्या आत तुमचे अपडेट्स पूर्ण केले जातील. यामुळे विविध कागदपत्रांच्या अद्ययावत प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची वेळ आणि त्रास कमी होईल.

या पोर्टलवरून तुम्ही तुमचे कागदपत्र एकाच इंटरफेसवर अपलोड करू शकाल, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि जलद होईल. यानंतर, नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करतांना काही शुल्क भरावे लागेल. तुम्ही नंतर ७ कामकाजी दिवसांत तुमचे नवीन कागदपत्र पोस्टाद्वारे घरपोच मिळवू शकाल

आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच ठिकाणी अपडेट करण्याची सुविधा लवकरच मिळणार आहे. केंद्र सरकार त्यासाठी एक डिजिटल प्रणाली लॉन्च करणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व ओळखपत्र मिळणार आहे. बदल करणे आणि नवीन ओळखपत्र घरपोच मिळवणे ही सर्व कामे या पोर्टलवर होणार आहे.

केंद्र सरकार एक पोर्टल बनवत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी आधार कार्ड(adhar card), पॅन कार्ड(pan card), वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट ही सर्व महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी अपडेट करता येणार आहे. त्यात नाव बदलणे, मोबाइल क्रमांक अपडेट करणे किंवा पत्ता नवीन करणे या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी होणार आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणी हा बदल केल्यावर इतर सर्व ठिकाणी तो बदल ऑटोमॅटीक होणार आहे.

रिपोर्टनुसार, पोर्टल विशिष्ट पद्धतीने डिजाइन केले आहे. त्यामुळे एकाच इंटरफेसच्या माध्यमातून वेगवेगळे डॉक्यूमेंट्स एकत्र करता येणार आहे. युजरला पोर्टलवर जाऊन नावात बदल, पत्त्यात बदल किंवा मोबाइल क्रमांक बदल असा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर गरजेचे दस्तावेज अपलोड करावे लागणार आहे. मग केवळ तीन दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे डॉक्यूमेंट अपडेट होणार आहे.

तुम्हाला अपडेट केलेले ओळखपत्र हवे असेल तर पोर्टलवर अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर सात दिवसांत अपडेट ओळखपत्र तुमच्या घरी येणार आहे. तसेच तुम्ही जवळच्या कार्यालयातून नवीन डॉक्यूमेंट कलेक्ट करु शकतात.

काही वर्षांपूर्वी सरकार कागदपत्रे मिळवणे म्हणजे मोठे द्राविडी प्राणायाम ठरत होते. एखाद्या कागदपत्रासाठी अनेक दिवस सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. परंतु आता डिजिटील तंत्रज्ञानामुळे सर्व सुविधा नागरिकांना घरबसल्या मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
46 %
2.6kmh
0 %
Thu
26 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!