33.6 C
New Delhi
Thursday, April 24, 2025
HomeTop Five Newsवारीत यंदा टेक्नोलॉजीचा जागर: QR कोड, ई-टॉयलेट्स आणि स्मार्ट सेवा!"

वारीत यंदा टेक्नोलॉजीचा जागर: QR कोड, ई-टॉयलेट्स आणि स्मार्ट सेवा!”

वारकऱ्यांसाठी सुविधांचा अभूतपूर्व आराखडा


पुणे, – आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, रस्त्यांची स्थिती, आरोग्य सेवा आणि सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणांनी सुसंगत आणि वेळेत नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर: QR कोडसह ई-टॉयलेट्स

यावर्षी वारी दरम्यान मोठ्या प्रमाणात फिरती ई-टॉयलेट्स उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांची स्वच्छता आणि देखभाल सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली जातील. विशेष म्हणजे, प्रत्येक स्वच्छतागृहावर QR कोड लावले जातील. वारकरी किंवा स्वयंसेवक अस्वच्छ टॉयलेट्सची छायाचित्रे QR कोडद्वारे अपलोड करू शकतील, ज्यामुळे प्रशासन त्वरित कृती करू शकेल. यासाठी खास मोबाईल अ‍ॅप विकसित केले जाणार आहे.

आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सोयी सुधारणार

शिवाय, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ केली जाणार आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमले जातील.

वाहतूक व रस्ते दुरुस्तीवर भर

वारी मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करण्यात येत असून, अपूर्ण महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालखी मार्गस्थ असताना अखंड वीजपुरवठा, पाण्याचे टँकर भरण्याची व्यवस्था आणि ध्वनीक्षेपकांबाबत नियमन यावरही चर्चा झाली.

बैठकीत महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती

या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त सीईओ चंद्रकांत वाघमारे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम संस्थानचे प्रमुख तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस व आरोग्य विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
33.6 ° C
33.6 °
33.6 °
4 %
2.1kmh
0 %
Wed
34 °
Thu
41 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!