27.1 C
New Delhi
Wednesday, April 8, 2026
HomeTop Five Newsपुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे बिनविरोध

पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे बिनविरोध

विरोधकांची शेवटच्या क्षणी माघार

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या ५८ व्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दाखल केलेले अर्ज अखेर माघारी घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी अधिकृतपणे जाहीर केले.

महापौर व उपमहापौर पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र भाजपकडून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी माघार घेतल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

विशेष बाब म्हणजे मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या पहिल्या महिला नगरसेविका ठरल्या आहेत. त्या प्रभाग क्रमांक ३५ मधून निवडून आल्या असून त्यांच्या निवडीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व दिले जात आहे.

निवड प्रक्रियेदरम्यान महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, भाजपकडून आधीच जाहीर करण्यात आलेल्या भूमिकेनुसार कोणताही जल्लोष किंवा विजय साजरा करण्यात आला नाही. शांत आणि औपचारिक वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली.

महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहराच्या विकासकामांना गती देण्यास प्राधान्य देणार असल्याचे संकेत मंजुषा नागपुरे यांनी दिले आहेत. आगामी काळात पुणे महापालिकेतील राजकीय समीकरणे आणि प्रशासनाशी समन्वय कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
27.1 ° C
27.1 °
27.1 °
39 %
2.1kmh
40 %
Wed
29 °
Thu
31 °
Fri
34 °
Sat
37 °
Sun
37 °

Most Popular

Recent Comments