32.1 C
New Delhi
Sunday, April 12, 2026
HomeTop Five Newsपुणे महानगरपालिकात स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची प्रक्रिया सुरू

पुणे महानगरपालिकात स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची प्रक्रिया सुरू

POLITICAL NEWS | पुणे : महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची निवड प्रक्रिया पूर्णत्वाकडे जात असतानाच आता पुणे महानगरपालिकातील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवून नावांची शिफारस करण्यास सांगितले आहे.

महापालिकेत सत्ताधारी पक्षाला मिळालेल्या बहुमतानंतर महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षपदांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक पदासाठीही इच्छुकांमध्ये चुरस वाढल्याचे चित्र आहे.

आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि काँग्रेसचा १ अशा एकूण १० सदस्यांची निवड होणार आहे. संबंधित पक्षांनी ९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आपापली नावे आयुक्तांकडे सादर करावीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मार्च महिन्यातील पहिल्या सर्वसाधारण सभेत या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तिकीट वाटप प्रक्रियेदरम्यान काही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने नाराजीचे सूर उमटले होते. काहींना एबी फॉर्म मिळूनही उमेदवारी नाकारली गेल्याची उदाहरणे आहेत, तर काही ठिकाणी बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची भावना व्यक्त झाली.

या पार्श्वभूमीवर नाराज कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पद महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे या दहा जागांसाठी विविध पक्षांतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्या असून इच्छुकांनी पक्ष नेत्यांकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.

आता गटनेत्यांकडून येणाऱ्या शिफारशींकडे सर्वांचे लक्ष लागले असून मार्चच्या पहिल्या सभेत कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.1 ° C
32.1 °
32.1 °
25 %
5.1kmh
0 %
Sun
35 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
40 °
Thu
40 °

Most Popular

Recent Comments