12.6 C
New Delhi
Saturday, January 10, 2026
HomeTop Five Newsदेवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागयचं नसतं!

देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागयचं नसतं!


– भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा इशारा
– उपमुख्यमंत्री अजित पवार ‘स्क्रीप्ट’वर बोलू नका!

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्क्रिप्ट’च्या आधारे एजन्सीच्या सल्ल्याने बिनबुडाचे आरोप केले. त्यांच्या काळात शहरात काय झाले आणि भाजपाच्या सत्ताकाळात काय विकासकामे केली हे आम्ही सांगतो.  पण, ‘‘देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका..’’ असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक- 2026 च्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पाजवळ आयोजित कार्यक्रमात निवडणुकीच्या प्रचाराचा शुभरंभ केला. यावेळी चव्हाण बोलत होते. या प्रसंगी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महामंत्री राजेश पांडे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भोसरी विधानसभेतील भरत लांडगे, शिवसेना उबाठा पिंपरी-चिंचवड शहर संघटक संतोष वाळके, उपविभाग प्रमुख अविनाश लोणारे, भाऊसाहेब काटे, भोसरी विधानसभा समन्वयक साईनाथ ढाकणे, मनोज परांडे, राजकुमार बांगर, शाखाप्रमुख प्रिमशिल पोटभरे, सचिन नायकुडे, सुभाष खेडकर, नवनाथ परांडे, पंडित वाळके, बापुशेठ परांडे, नितीन परांडे, पप्पु तुपे, चेतन कदम, संकेत परांडे, शुभम वाळके, ऋत्विक कदम, अमित सोरटे, सुदर्शन कदम, अजय काळे, प्रदीप परांडे, किरणशेठ वाळके, अजय परांडे, निलेश वाळके यांच्यासह राष्ट्रवादीचे अनवर शेख, गणेश सानप, संतोष फुंदे, रविंद्र राख, सरचिटणीस अजहर खान, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गंगाताई धेंडे, कायदा सेलचे ॲड. विशाल जाधव, ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष गणेश सस्ते, गणेश यादव, महिला आघाडीच्या शुभांगी जाधव आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
**

खोटा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न…
रविंद्र चव्हाण म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता कायम लोकांच्या सेवेत आहे. सेवेतून संघटन आम्ही पुढे नेत आहोत. केंद्र व राज्य सरकारने सातत्याने लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मोदी सरकार, फडणवीस सरकारला लोकप्रियता मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे खोटा नॅरेटिव्ह केला. तसा आता काहीलोक महापालिका निवडणुकीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही लोकांना एजन्सीज्‌ स्क्रिफ्ट लिहून देतात. एजन्सीज भाड्याने घ्यायच्या आणि पैसा जक्कड आहे. त्यामुळे हजार-दोन हजार लोकांना कंपन्यांमध्ये बसवून ट्रोल करायला पैसे द्यायचे. मी किती पॉप्युलर आहे, हे दाखवण्यासाठी काहीपण करायला लोक तयार आहेत, असा घणाघातही चव्हाण यांनी केला .
***

प्रतिक्रिया :
भारतीय जनता पार्टीची विचारधारा ‘राष्ट्र प्रथम’ म्हणून काम करीत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवडकर भुलणार नाहीत. वर्षानुवर्षे त्यांनी केलेला कारभार पिंपरी-चिंचवडकरांनी पाहिला आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी, मेट्रो सिटी घडवण्यासाठी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभा केले पाहिजे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात याचा विचार केला नाही आणि आज वर तोंड करुन बोलत आहेत. हिंदुत्वाचं नाव घ्ययला घबारताहेत. हिंदुत्वाचे नाव घ्यायला अंगत रग लागते. ती भाजपाशिवाय कोणाकडेही नाही.
– रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
12.6 ° C
12.6 °
12.6 °
40 %
1.8kmh
1 %
Sat
21 °
Sun
21 °
Mon
21 °
Tue
22 °
Wed
18 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!