27.1 C
New Delhi
Tuesday, April 7, 2026
HomeTop Five Newsपुण्यात काँग्रेसचे खाते उघडले

पुण्यात काँग्रेसचे खाते उघडले


पुणे- पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची आघाडी कायम असतानाच काँग्रेसला दिलासादायक यश मिळाले आहे. शहरात काँग्रेसचा पहिला विजय नोंदवला गेला असून, प्रभाग क्रमांक १८ मधून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी विजय संपादन केला आहे.या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अभिजीत शिवरकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपचे उमेदवार असलेल्या अभिजीत शिवरकर यांचा पराभव करत प्रशांत जगताप यांनी काँग्रेससाठी महत्त्वाचा विजय खेचून आणला. या निकालामुळे पुण्यात काँग्रेसचे खाते अखेर उघडले आहे.प्रभाग क्रमांक १८-ड मधून प्रशांत जगताप यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली. मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांपर्यंत उत्कंठा कायम होती, मात्र अखेर प्रशांत जगताप यांनी बाजी मारली.


महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षबदलानंतरची ही त्यांची पहिलीच निवडणूक असून, त्यात मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
27.1 ° C
27.1 °
27.1 °
41 %
6.2kmh
75 %
Tue
31 °
Wed
30 °
Thu
31 °
Fri
34 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments