15.1 C
New Delhi
Tuesday, December 16, 2025
HomeTop Five Newsसीमा सावळे यांनी केला ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

सीमा सावळे यांनी केला ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

पिंपरी : : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहर भाजपला मोठा धक्का दिला आहे. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याबरोबर शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू असलेले आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी दुसऱ्याचदिवशी पुण्यात पिंपरीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. त्यांनी भाजप, दोन्ही शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सावळे या तीनवेळा महापालिकेत निवडून आल्या आहेत. दोनवेळा शिवसेनेकडून आणि भाजपकडून एकवेळेस निवडून आल्या आहेत.महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आणण्यात सावळे यांचेही योगदान मानले जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
15.1 ° C
15.1 °
15.1 °
67 %
1.5kmh
66 %
Tue
20 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
26 °
Sat
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!