36.1 C
New Delhi
Wednesday, May 13, 2026
HomeTop Five Newsपुणे बाल पुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून

पुणे बाल पुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून

मुलांसाठी ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजनाची मेजवानी

पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६

PUNE CHILDERN BOOK STALL | पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आणि वाचनाची गोडी लावण्यासाठी शहरात ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणारी ही जत्रा ४ मे पर्यंत गणेश कला क्रीडा मंच येथे रंगणार असून, पुस्तकांसह विविध शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांची मेजवानी येथे अनुभवता येणार आहे.

लहान मुलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या जत्रेत कथा-कविता सत्रे, विज्ञान गप्पा, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे मुलांना खेळता-खेळता शिकण्याचा अनुभव मिळणार असून, त्यांची सर्जनशीलता आणि विचारशक्ती वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

या जत्रेचे आयोजन पुणे महानगरपालिका, पुणे पुस्तक महोत्सव, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ ३० एप्रिल रोजी दुपारी चार वाजता होणार असून, त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनानंतर १ मेपासून मुलांसाठी खास कार्यक्रमांची मालिका सुरू होणार आहे. ‘हसण्याची बायारकी’ या कार्यक्रमातून हास्याचा आनंद मिळणार आहे, तर ‘हा खेळ बाहुल्यांचा’ या उपक्रमातून कथानक आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ अनुभवता येईल. सायंकाळी ‘चिंटू तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमामुळे मुलांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

२ मे रोजी शिक्षण आणि विज्ञानाचा संगम पाहायला मिळणार आहे. ‘स-संविधानाचा!’ या बालनाट्यातून मुलांना संविधानाची ओळख करून दिली जाईल. ‘विज्ञान गप्पागप्पी’ या सत्रातून प्रयोग आणि संवादाच्या माध्यमातून विज्ञानाची गोडी वाढवली जाईल. याच दिवशी ‘एआय तुमचा नवा स्टडी बडी’ या सत्रातून आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासात कसा उपयोग करता येईल, याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

३ मे रोजी ‘कथा कवितांच्या राज्यात’ या कार्यक्रमातून मुलांना साहित्यविश्वाची ओळख करून दिली जाईल. त्यानंतर ‘सलाम भारतीय वायुसेनेला!’ या कार्यक्रमातून एरो मॉडेलिंग आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देशभक्तीची भावना जागवली जाणार आहे.

४ मे रोजी जत्रेचा समारोप होणार असून, ‘मुलांचा स्क्रीन टाइम कमी कसा कराल?’ या चर्चासत्रातून पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समारोपाचा दिवसही रंगतदार होणार आहे.

ज्ञान, मनोरंजन आणि सर्जनशीलतेचा संगम असलेली ही ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ मुलांसह पालक आणि शिक्षकांसाठीही एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार असून, पुणेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
36.1 ° C
36.1 °
36.1 °
38 %
2.6kmh
20 %
Wed
37 °
Thu
45 °
Fri
45 °
Sat
44 °
Sun
46 °

Most Popular

Recent Comments