पुण्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रो (Pune Metro Airport Link)लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडली जाणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खा. मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेला विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल पुढील तीन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या नव्या मेट्रो (PuneMetro)मार्गामुळे खराडी येथून थेट लोहेगाव विमानतळ गाठता येणार असून, तो स्वारगेट, हडपसर, खडकवासला मार्गाशी जोडला जाईल. पुण्यातील (Pune) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला- लोहेगांव (Pune International Airport) पुणे मेट्रो (Pune Metro) जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुणे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेला (PMC) विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल येत्या तीन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पुण्याच्या मेट्रो विस्ताराला गती मिळेल. हा मेट्रो मार्ग खराडी ते विमानतळ असा असेल आणि खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या विद्यमान(UrbanTransport) मार्गाशी जोडला जाईल.
यामुळे पुण्याच्या विविध भागांतून विमानतळापर्यंत प्रवास सुलभ होईल. खराडी हे व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रात झपाट्याने विकसित होणारे केंद्र आहे. या ठिकाणी इंटरचेंजेबल आणि मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्याची योजना आहे. हे हब चांदणी चौक-वाघोली, निगडी-स्वारगेट,(Pune Metro New Route Katraj to Hinjewadi) हिंजवडी-शिवाजीनगर यांसारख्या मेट्रो मार्गांना विमानतळाशी जोडेल, ज्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना मेट्रोद्वारे विमानतळ गाठणे सोयीचे होईल.
या प्रकल्पामुळे प्रवाशांना शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळ गाठणे अधिक सुलभ होईल. खराडीमध्ये मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार असून तो चांदणी चौक-वाघोली, निगडी-स्वारगेट आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गांशी जोडला जाईल.
बैठकीत कात्रज ते हिंजवडी या नव्या मेट्रो मार्गाचाही प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय पिंक ई-रिक्शा फीडर सेवा मेट्रो स्टेशन ते विमानतळासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा प्रकल्प पुण्याच्या पुढील ५० वर्षांच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये पुरंदर ग्रीनफिल्ड विमानतळाचा डीपीआर सप्टेंबर 2025 पर्यंत तयार होणार असून, तो 2029 पर्यंत कार्यान्वित होईल.