32.7 C
New Delhi
Thursday, June 19, 2025
HomeTop Five Newsदेशातील पहिला ‘रेडिओ’ महोत्सव

देशातील पहिला ‘रेडिओ’ महोत्सव

मराठी कलाकारांना नवे व्यासपीठ

मुंबई, : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देशातील पहिल्या सृजनशील आणि सांस्कृतिक ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हा ऐतिहासिक सोहळा २१ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्कारांचे वितरणही या वेळी होणार आहे.

मंत्री शेलार म्हणाले, “रेडिओ क्षेत्राला गौरव देणारा हा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला उजाळा देणारा आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आकाशवाणी, एफएम चॅनेल्स आणि कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून मराठी भाषा, संगीत, साहित्य आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन झाले आहे.”

या महोत्सवात ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ आशा भोसले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार आहे. विविध गटांमध्ये सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र, कम्युनिटी रेडिओ, मनोरंजन व सामाजिक कार्यक्रम, निवेदक, तंत्रज्ञ, मराठी निवेदक, सामाजिक उत्तरदायित्व, स्टोरी टेलिंग आदी १२ पुरस्कारांचे वितरण होईल. नामनिर्देशनाद्वारे निवड झालेल्या कलाकारांना मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू देण्यात येईल.

या पुरस्कारांसाठी इच्छुक कलाकार, तंत्रज्ञ, रेडिओ केंद्रांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करावी लागेल. पुरस्कार निवड प्रक्रियेत शासकीय सदस्यांसह रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल.

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेडिओद्वारे निवेदकांशी संवाद साधणार आहेत. तसेच, रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटातील प्रसिद्ध गाणी, गप्पा, किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांकडून होईल. सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे यांचे सादरीकरण आणि ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून, सन्मानिका १९ जूनपासून सांस्कृतिक कार्य संचालनालयात उपलब्ध असतील. मंत्री शेलार यांनी सर्व रेडिओ प्रेमी आणि रसिकांना या अनोख्या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
32.7 ° C
32.7 °
32.7 °
56 %
4.1kmh
64 %
Thu
33 °
Fri
35 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments