21.1 C
New Delhi
Thursday, March 19, 2026
HomeTop Five Newsरोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरला ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर! 

रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरला ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर! 

विश्वविजेत्या कर्णधारांचा मोठा बहुमान

Padma Awards 2026 Announce : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या प्रतिष्ठित पद्मश्री’ पुरस्कारची घोषणा केली आहे. यावर्षी एकूण १३१ मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ९ दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर यश मिळवून देणाऱ्या रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर या दोन कर्णधारांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

रोहित-हरमनप्रीतला पद्मश्री पुरस्कार जाहीर –

भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार  आणि महिला संघाची विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० वर्ल्ड कप आणि २०२५ ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. त्यानंतर २०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून हरमनप्रीत ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णधार ठरली आहे. या दोघांशिवाय भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार यालाही ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

विजय अमृतराज यांना ‘पद्मभूषण’ –

टेनिस क्षेत्रातील भारताचे मोठे नाव असलेले माजी खेळाडू विजय अमृतराज यांची ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील इतर मान्यवरांमध्ये सविता पुनिया (हॉकी), बलदेव सिंह, के. पजनीवेल, भगवानदास रायकवार आणि जॉर्जियाचे व्लादिमीर मेस्टविरिश्विली यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
21.1 ° C
21.1 °
21.1 °
78 %
2.6kmh
75 %
Thu
30 °
Fri
22 °
Sat
29 °
Sun
32 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments