17.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
HomeTop Five News१,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली!

१,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली!


पुणे, – “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये रूपांतर करणे आहे,” सिडनी जे. हॅरिस यांचे हेच वचन लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) जगते. उच्च शिक्षणाच्या संधींद्वारे मुलींच्या सक्षमीकरणाला पाठिंबा देणाऱ्या या फाउंडेशनने २०२५ या वर्षात भारतातील १,४५० हून अधिक गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या गरजू मुलींना गुणयोग्यता आणि गरज – आधारित शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.
शिष्यवृत्ती मिळालेल्या १,१०० हून अधिक मुली अभियांत्रिकी, नर्सिंग, मूलभूत विज्ञान आणि आरोग्य विज्ञान या क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पदवीचे शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त, सातवीच्या ३५० हून अधिक तरुण मुली एलपीएफच्या वाढत्या कुटुंबात सामील झाल्या आहेत. त्या आमच्या शालेय प्रकल्पाचा भाग आहेत, जो मुलींना १० वर्षे सातवीपासून पदवीपर्यंत मदत करतो.
या वर्षी, एलपीएफ शिक्षणाद्वारे जीवन बदलण्याच्या ३० वर्षांचा अभिमानाने उत्सव साजरा करत असताना, फाउंडेशनने संपूर्ण भारतात ११ प्रादेशिक पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले. या महत्त्वाच्या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे ३० वा शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळा, ज्याला डॉ. किरण बेदी (भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल) यांनी उपस्थिती लावून शोभा वाढवली. एलपीएफचे चिरस्थायी ध्येय आणि प्रभाव साजरा करण्यासाठी त्या तीन दशकांनंतर परत एकदा प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या.वरिष्ठ मुलींच्या पहिल्या समूहाने एलपीएफसोबतचे त्यांचे अनुभव सांगितले; त्या आता जगभरात नेतृत्व पदांवर कार्यरत आहेत.


या प्रसंगी बोलताना डॉ. बेदी म्हणाल्या, “फाउंडेशनच्या ३० व्या वर्षात प्रमुख पाहुण्या म्हणून परत येताना मला अभिमान वाटत आहे. तीन दशकांपूर्वी जेव्हा मी आले होते, तेव्हा फक्त २० मुली लाभार्थी होत्या, आणि आता एलपीएफ हे जवळपास १९,००० सदस्यांचे कुटुंब आहे, जे मला तुमच्या, लीला कन्यांमध्ये असलेल्या सामर्थ्याची आठवण करून देते.”
या पुरस्कार सोहळ्यांना विविध संस्थांमधील प्रतिष्ठित पाहुण्यांनी, तसेच आता त्यांच्या करिअरमध्ये नेतृत्व पदांवर असलेल्या वरिष्ठ लीला मुलींनी उपस्थिती लावून शोभा वाढवली. त्यांचे प्रेरणादायी शब्द आणि वैयक्तिक आयुष्याच्या प्रवासाने लीला मुलींच्या नवीन समूहाला यशाच्या मार्गावर वाटचाल सुरू करताना खूप प्रेरणा मिळाली. पद्मश्री श्रीमती लीला पूनावाला (अध्यक्षा, एलपीएफ), श्री फिरोज पूनावाला (संस्थापक विश्वस्त), माजी विश्वस्त आणि सध्याचे विश्वस्त मंडळ, कॉर्पोरेट भागीदार, देणगीदार, एलपीएफचे वरिष्ठ व्यवस्थापक, निवड समिती सदस्य, वरिष्ठ लीला कन्या आणि हितचिंतक यांच्या सन्माननीय उपस्थितीत या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
या महत्त्वाच्या वर्षाचे सिंहावलोकन करताना, श्रीमती लीला पूनावाला म्हणाल्या,
“एलपीएफ ३० अविश्वसनीय वर्षे पूर्ण करत असताना, आम्हाला जवळपास १९,००० लीला कन्यांना सक्षम केल्याचा अभिमान वाटतो. आमचे कार्य शिष्यवृत्तीपुरते मर्यादित नसून, विविध कौशल्य विकास कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर समुपदेशन सत्रे, कर्मचारी सहभाग उपक्रम, कॉर्पोरेट सज्जता कार्यक्रम, कॉर्पोरेट कंपन्यांचे नेतृत्वाचे विचार भाषणे आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष भेटी यांसारख्या उपक्रमांद्वारे आम्ही ते अधिक व्यापक केले आहे. आम्ही खात्रीशीर सांगतो की प्रत्येक लीला कन्येला केवळ शिक्षणच नव्हे, तर तिच्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, आत्मविश्वास आणि व्यावहारिक जगाचे ज्ञान मिळते. शिक्षण आणि नोकरी यातील दरी कमी करण्यासाठी हे उपक्रम उपयोगी ठरतात आणि आमच्या मुलींना भावी नेत्या, उपक्रमशील आणि परिवर्तन घडवणाऱ्या म्हणून जगात पाऊल ठेवण्यासाठी तयार करतात.”
त्यांनी संस्थापक विश्वस्त, विश्वस्त मंडळ, कॉर्पोरेट भागीदार, देणगीदार, प्रशिक्षक, लीला माजी विद्यार्थिनी, हितचिंतक आणि कर्मचारी सदस्य यांचेही मनःपूर्वक आभार मानले, ज्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे हे परिवर्तनाचे ध्येय शक्य होते.
एलपीएफ भारतातील ६ शहरांमध्ये कार्यरत आहे, ज्यात महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर आणि तेलंगणातील हैदराबाद व कर्नाटकातील बंगळूर यांचा समावेश आहे. जवळपास १९,००० लीला कन्या आधीच एलपीएफ कुटुंबाचा भाग आहेत, आणि २०३० पर्यंत २५,००० मुलींना सक्षम करून त्यांच्या जीवनात, त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या आणि त्या राहत असलेल्या समुदायांवर परिणाम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर फाउंडेशन ठाम आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
67 %
1.5kmh
0 %
Wed
22 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!