13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeTop Five News30 सप्टेंबरपूर्वी कर भरल्यास थेट ४ टक्के सवलत

30 सप्टेंबरपूर्वी कर भरल्यास थेट ४ टक्के सवलत

लाभ घेण्यासाठी फक्त ७ दिवस बाकी

पिंपरी चिंचवड महापालिकेचे मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन

पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन (tax)विभागामार्फत नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चालू वर्षासाठी मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी भरल्यास सामान्य करावर थेट चार टक्के सवलत मिळणार असून, हा लाभ घेण्यासाठी आता केवळ ७ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ज्यांनी ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी कर भरला नाही, त्यांना प्रत्येक महिन्याला दोन टक्के विलंब दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी त्वरित कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

१ एप्रिल २०२५ ते २२ सप्टेंबर दरम्यान महापालिकेला ५९५ कोटी २४ लाख रुपयांचा मालमत्ता कर संकलित झाला आहे. शहरात ७ लाख २६ हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्ता असून, त्यापैकी ४ लाख ६१ हजार ५०३ मालमत्ताधारकांनी चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा केला आहे. यामध्ये ऑनलाइन मालमत्ता कर भरून सवलतीचा लाभ घेणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या ३ लाख ८० हजार ९४९ आहे.

कर वसुलीसाठी १८ विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने किंवा अॅपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
…….
थकबाकीदारांवर कडक कारवाई होणार

२५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये बिगर निवासी मालमत्ताधारकांची वाहन जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे तसेच बिगर निवासी मालमत्ताधारकांची थकीत मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना कर आकारणी व कर संकलन आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या. महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा मालमत्ता करातून येतो आणि नागरिकांनी जबाबदारीने वेळेत कर भरल्यास शहरातील विकासकामांना वेग येईल. थकबाकीदारांनी विलंब न करता कर भरावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
…….

मालमत्ता कर हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महसुलाचे प्रमुख साधन आहे. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास महापालिकेला विकासकामांना गती देता येईल आणि नागरिकांसाठी आणखी सुविधा निर्माण करता येतील. नागरिकांनी ही संधी गमावू नये आणि ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी कर भरून चार टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घ्यावा.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
……

पिंपरी चिंचवड महापालिकेने कर भरण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन, मोबाईल अॅप आणि १८ विभागीय कार्यालयांद्वारे सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेऊन वेळेत कर भरल्यास आपण केवळ सवलतीचाच फायदा घेत नाही, तर शहराच्या विकासात आपले मोलाचे योगदान देतो.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!