13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeTop Five Newsमृत्यूच्या छायेतून माझा पुन्हा जन्म: रमेश विश्वकुमार

मृत्यूच्या छायेतून माझा पुन्हा जन्म: रमेश विश्वकुमार

Ahmedabad plane crash survivor | अहमदाबादमध्ये १२ जून रोजी घडलेल्या एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटनेत 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या भीषण अपघातातून केवळ एकच प्रवासी वाचला – रमेश विश्वकुमार (वय 40), सीट नंबर 11A. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत असून, स्वतः रमेश यांनी आपल्या थरारक अनुभवाची माहिती दिली आहे.

रमेश सांगतात, “विमानाचा ज्या भागात माझी सीट होती, तो कदाचित इमारतीच्या खालच्या भागात आदळला. वरच्या भागात मोठी आग लागली होती. मी सीटसह खाली फेकलो गेलो आणि त्या भागातून कसा तरी रेंगाळत बाहेर पडलो. दरवाजा तुटलेला होता, समोर रिकामी जागा दिसताच मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.” त्यांच्या डोळ्यांसमोर दोन एअर होस्टेस आणि एक काका-काकू पूर्णपणे जळत होते. लोक आगेमध्ये अडकले होते आणि मदतीसाठी आरडाओरड करत होते. हे सांगताना रमेश यांचा आवाज भरून आला.

अपघातात रमेश यांचा डावा हात गंभीरपणे भाजला असला तरी त्यांचा जीव वाचला, हे त्यांच्या कुटुंबासाठी आश्वासक आहे. रमेश यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रुग्णालयात गेले आणि डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. रमेश यांच्या धैर्याचे कौतुकही पंतप्रधानांनी केले.

या अपघातानंतर चौकशी प्रक्रियेला गती मिळाली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, त्यातील डेटा आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून अपघाताचे नेमके कारण शोधले जाणार आहे. यातून टेकऑफ दरम्यान काय घडले, पायलट्समधील संवाद, सिग्नल्स आणि तांत्रिक बिघाड यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

News title- “My Rebirth from the Shadow of Death: Ramesh Vishvkumar”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!