पिंपरी, :-
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सर्व महापालिकांनी दुबार मतदार यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. यासाठी २७ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तसेच मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठीची अंतिम मुदत ३ जानेवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी २७ डिसेंबर २०२५ ही तारीख निश्चित केली होती.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व अचूकता सुनिश्चित करण्यासाठी हा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
18.3
°
C
18.3
°
18.3
°
19 %
2.5kmh
0 %
Thu
31
°
Fri
33
°
Sat
34
°
Sun
34
°
Mon
34
°


