26.3 C
New Delhi
Tuesday, March 3, 2026
HomeTop Five Newsस्त्री ही कुटुंबाला व समाजाला आधार देते- अभिनेत्री शर्वरी जैमिनिस

स्त्री ही कुटुंबाला व समाजाला आधार देते- अभिनेत्री शर्वरी जैमिनिस

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे‘बाई पण भारी देवा’ कार्यशाळा संपन्न

तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ मधुरा बाचल व झेलम चौबळ सन्मानीत

पुणे, – : ” स्त्री ही शक्ती असून सशक्त विचार, नैसर्गिकरित्या कणखर आणि संकटांशी लढणारी असते . कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून सामाजिक क्षेत्रात काम करते. शारीरिक वेदना, भावनिक आव्हाने सहन करुन स्वतः बरोबर कुटुंबाला आणि समाजाला आधार देत असते.” असे मत अभिनेत्री शर्वरी जैमिनिस यांनी व्यक्त केले.

तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे तनुश्री संस्कार साधना या नावाने ‘बाई पण भारी देवा’ या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

यावेळी कलाकार किशोर महाबोले, कलाकार अश्विनी कासार, मधुरा रेसीपीच्या मधुरा बाचल, केसरी टूर्सच्या झेलम चौबळ, डॉ. सुनंदा रानडे, डॉ.अस्मिता वेले, वीणा गोखले ह्या सन्मानीत पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
तसेच डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. तन्वी खाबिया (गुगळे) डॉ. अनिल गुगळे व खाबिया उपस्थित होते.

या प्रसंगी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले.

शर्वरी जैमिनिस म्हणाल्या,” सशक्त जीवन शैली बनविण्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. स्त्रीयांनी आनंदी होण्यासाठी कारणे शोधण्याची गरज नाही. तीने छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिकावे. तीने स्वतःच्या अंतर्मनातला आवाज ऐकावा आणि स्वतःवर प्रेम करावे.”

डॉ. सुप्रिया गुगळे म्हणाल्या,” हे विश्वची माझे घर हा अनुभव आज येतो. बाईपण भारी देवा हे वाक्य नाही ही जाणीव असून हे सामर्थ्य आहे. ते प्रत्येक स्त्री कडे आहे. ती हसण कधी विसरत नाही, ती थकते पण थांबत नाही. प्रेम, सहनशक्ती, सामर्थ्याची ती प्रचिती आहे.”

प्रा.डॉ.अस्मिता वेले यांनी ‘स्त्री आरोग्य आणि आयुर्वेद’ या विषयावर विचार मांडतांना म्हणाल्या, ” महिलांना या संदर्भात जागृत करणे काळाची गरज आहे. आपली दिनचर्या नियमित व व्यवस्थित ठेवल्यास त्या आजारी पडणार नाही. परंतू आजच्या काळात त्या तनाव आणि डिप्रेशन मध्ये जातांना दिसतात. मोनोकॉजमध्ये आल्यावर त्यांच्या शरीरातील बदलत्या हार्मोन्समुळे हे घडत असत. त्यासाठी सतत सजग राहावे. मुलींनी आहार व व्यायामबद्दल जागृत असावे.”

किशोर महाबोले म्हणाले,” या भूतलावर निर्सगाने मादी व माती या दोघांना बीज निर्मितीचा खरा आनंद दिला आहे. तसेच जीवन जगण्याचा खरा आनंद घ्यावयाचा असेल तर निस्वार्थ आणि उदात्त हेतू ने अनोळखी व्यक्तीला मदत करा. बाई पण भारी देवा हे एका अर्थाने सन्मान जनक गोष्ट आहे.”

अश्विनी कासार म्हणाल्या,” प्रत्येक महिलेने स्वतःच्या हॉबीला करियर म्हणून निवडल्यास अभिव्यक्ती जपण्याचे सामर्थ्य निर्माण होते. तीने आत्ममग्न बरोबरच आत्मभान ठेऊन जीवन जगावे. जेणे करुन आनंद शोधण्याची गरजच भासणार नाही.”

पुरस्कार स्वीकारल्या नंतर मधुरा बाचळ म्हणाल्या, “ज्या महिलांना जीजाऊ कळली त्यांना देश आणि राज्य कळते. संस्कार हे रुजवावे लागतात. शारीरिक तंदुरूस्तीसाठी मुलांना मैदानी खेळासाठी प्रेरित करावे. आई ज्या पद्धतीने गर्भ संस्कार व कर्म संस्कार देते, तसेच अन्न संस्कार ही खूप महत्वाचे आहे. ”

झेलम चौबळ म्हणाल्या, “आपण जे करियर निवडतो त्यात आनंद शोधता आला पाहिजे. जीवनात येणार्‍या सर्व परिस्थितीचा कठोर सामना केल्यास त्यातून मिळालेला आनंद हा द्विगुणित होतो.”

यानंतर विणा गोखले यांनी देणे समााजचे या भावनेतून सर्वानी समाजासाठी सकारात्मक कार्य करण्यासाठी पाऊल उचलण्याचे सांगितले.

प्रास्ताविकेत डॉ. तन्वी खाबिया (गुगळे) यांनी सांगितले की, घरात शिवबा होण्यासाठी स्त्रीला अगोदन जीजाई होणे गरजेचे आहे. संस्थेने सुरु केलेला २९ वर्षाचा हा प्रवास आज वटवृक्षात बदलेला आहे.

सूत्रसंचालन वसुंधरा काशिकर यांनी केले. मनोज मुनोत यांनी आभार मानले.


आदी महिला शक्ती रॅप वॉक वर

स्त्री ही आदी शक्ती असून तिच्यातील दडलेली शक्ती, आत्मविश्वास, स्वाभिमान, संस्कार आणि सकारात्मक विचारांच्या बळावर तीने स्वतःला सक्षम केल आहे. तिच्याच हातून सुंदर, सुदृढ आणि संस्कारित उद्याचे भविष्य घडते. या उदात्त हेतूने येथे रॅप वॉक करण्यात आले. या मध्ये राजमाता जीजाबाई, सावीत्रीबाई फुले, डॉ. आनंदी जोशी, झाशीची राणी, शकुंतला परांजपे, सुधा मुर्ती, सिंधूताई सपकाळ, द्रौपदी र्मुमू, स्व. लता मंगेशकर, किरण बेदी, इंद्रा नुरी, स्व, मधूबाला, सुनिता विल्यम, माधुरी दिक्षीत आणि हाउस वाईफ म्हणजेच होम मेकर्सच्या व्यक्तिरेखात महिलांनी आपली शक्ती दाखवून दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.3 ° C
26.3 °
26.3 °
14 %
4.5kmh
0 %
Tue
26 °
Wed
37 °
Thu
39 °
Fri
39 °
Sat
38 °

Most Popular

Recent Comments