27.5 C
New Delhi
Friday, October 10, 2025
HomeTop Five News‘देवेंद्र पर्वा’तून शाश्वत विकासाची वाटचाल!

‘देवेंद्र पर्वा’तून शाश्वत विकासाची वाटचाल!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवार, १८ जून रोजी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी शहरभर “विकासाचे देवेंद्र पर्व” या संकल्पनेचे जोरदार ब्रँडिंग केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्रीक्षेत्र देहू-आळंदी पालखी मार्गावरील चऱ्होली येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीवर आधारित संतसमूह शिल्पाचे बहुप्रतिक्षित लोकार्पण होणार आहे. तसेच, या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सर्वात उंच 200 फूट उंच भगव्या ध्वजाचा आणि संतसृष्टी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय, थोरल्या पादुका मंदिर, वडमुखवाडी येथे संतसृष्टी प्रकल्प, टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतीपठमधील सभागृह व कक्ष, १.५० लाख देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘ज्येष्ठानुबंध’ (ज्येष्ठ नागरिकांसाठी ॲप) आणि ‘ट्रॅफिक बडी’ (वाहतूक नियमनासाठी व्हॉट्सॲप प्रणाली) या उपक्रमांचाही शुभारंभ होणार आहे.

या प्रकल्पांचे होणार भूमिपूजन –

  • प्रभाग क्र. १६ मधील मुकाई चौक (कृष्णा हॉटेल) ते लोढा स्कीमपर्यंत एक्स्प्रेस वेलगत १२ मीटर डीपी सर्व्हिस रस्ता
  • बापदेव मंदिर ते एक्स्प्रेस वे पर्यंतचा सिंबायोसिस कॉलेजमागील १८ मीटर डीपी रस्ता
  • विकासनगर येथील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण
  • गवळीमाथा ते इंद्रायणीनगर चौक रस्त्याचे अर्बन स्ट्रीट स्केपिंग
  • दिव्यांग नागरिकांसाठी मॅपिंग उपक्रमाचा प्रारंभ

या प्रकल्पांचे होणार लोकार्पण –

  • संत मदर टेरेसा उड्डाणपुलावरून चिंचवडकडे उतरणाऱ्या आणि चढण्यासाठी बांधलेल्या लूप-रॅम्पचा लोकार्पण
  • थेरगाव प्रभाग क्र. ५० मध्ये प्रसूनधाम शेजारी १८ मीटर डीपी रस्त्यावर उभारलेला थेरगाव-चिंचवड पूल
  • पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी उभारलेली क्लायबिंग वॉल
  • दिघी (प्रभाग क्र. ४) येथील शाळा इमारत (आरक्षण क्र. २/१२२)
  • चऱ्होली येथील चोविसावाडीमधील अग्निशमन केंद्र इमारत
  • भोसरी प्रभाग क्र. ७ मधील प्राथमिक शाळा इमारत
  • थेरगाव आणि भोसरी येथील रुग्णालयांतील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग
  • प्रभाग क्र. ५ मधील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथील बहुमजली वाहनतळ इमारत

शहराच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. शहरातील पाणी प्रश्न, समाविष्ट गावांचा समतोल विकास आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नावारूपाला येत आहे.

“२०१४ पासून भाजपाच्या महायुती सरकारने शहर विकासास चालना दिली आहे. आज लोकार्पण आणि भूमिपूजन होणारे प्रकल्प त्याचे उत्तम उदाहरण आहेत. पिंपरी-चिंचवड शहर शाश्वत विकासाचे ‘रोल मॉडेल’ ठरावे, या ध्येयाने आम्ही कार्य करीत आहोत,” असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.5 ° C
27.5 °
27.5 °
40 %
3.3kmh
0 %
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!