13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeTop Five Newsफक्त 12 व्या वर्षी देशातील सर्वोत्तम युवा वैज्ञानिक!

फक्त 12 व्या वर्षी देशातील सर्वोत्तम युवा वैज्ञानिक!

पिंपळे सौदागरचा आत्मज पराग जैनचा राष्ट्रीय गौरव – भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्याकडून सन्मान..

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथील रहिवासी अवघ्या 12 वर्षांचा कु.आत्मज पराग जैन या बाल वैज्ञानिकाने विज्ञान क्षेत्रात अभिमानास्पद यश संपादन केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड STEM अँड रोबोटिक्स ऑलिंपियाड (WSRO) मध्ये प्रादेशिक फेरीत यश मिळवून राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. तो ‘यंग सायंटिस्ट – ऑल STEM ओपन कॅटेगरी’ मध्ये राष्ट्रीय विजेता ठरला आहे.

या यशामुळे आत्मजला येत्या नोव्हेंबर महिन्यात रोम (इटली) येथे होणाऱ्या फिबोनाची इंटरनॅशनल रोबोट ऑलिंपियाड (FIRO) या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.ही स्पर्धा जगभरातील तरुण नवोन्मेषकांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि प्रेरणादायी मानली जाते.

आत्मजने भारतीय पूल संरचनांच्या आयुष्यात वाढ करून त्या अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्यासाठी IoT आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून एक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला आहे.

देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांमध्ये आत्मजने आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाद्वारे वैज्ञानिक विचार, संशोधन आणि तांत्रिक सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला. त्याच्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांनी कु.आत्मजचा शाल आणि ट्रॉफी देऊन सन्मान केला. या प्रसंगी आत्मजचे आई प्रियांका पराग जैन तसेच श्री दिपक नागरगोजे आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त करीत म्हणाले की,“पिंपळे सौदागरसारख्या भागातून आत्मजसारख्या तेजस्वी विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक मिळवणे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. १२ व्या वर्षीच त्याने संपूर्ण भारतात आपली ओळख निर्माण केली आहे. अशा मुलांमुळे आपल्या शहराचा आणि राज्याचा गौरव वाढतो. आत्मजसारखी मुले भारताच्या उज्ज्वल वैज्ञानिक भविष्याची पायाभरणी करत आहेत. त्याच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

आत्मजच्या या यशामुळे पिंपळे सौदागर परिसरात आणि पिंपरी-चिंचवड शहरात आनंदाचे वातावरण आहे. शाळा, शिक्षक आणि नागरिकांकडून आत्मजवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, बालवयातच विज्ञानक्षेत्रात देशभर नाव कमावणारा हा कुमार भविष्यात भारताचा अभिमान ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!