33.1 C
New Delhi
Sunday, May 31, 2026
Homeताज्या बातम्याविकास कामांना गती देण्यासाठी सरसावले नूतन नगरसेवक

विकास कामांना गती देण्यासाठी सरसावले नूतन नगरसेवक

विकासकामातील दिरंगाईवर नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे समवेत नगरसेविका सौ अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ कुंदाताई भिसे यांचा आक्रमक पवित्रा

प्रभाग २८ मध्ये मॅरेथॉन आढावा बैठक — पालिका अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले

पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठक व प्रत्यक्ष पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तिन्ही नगरसेवक ॲक्शन मोडमध्ये असून, विकासकामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला.

या आढावा बैठकीदरम्यान काही विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत नगरसेवक शत्रुघ्न काटे समवेत दोन्ही नगरसेविका यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले.कामांचा दर्जा, विलंबाची कारणे व अपूर्ण कामांबाबत स्पष्टीकरण मागून,पुढील कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

प्रभागातील रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था,पाणीपुरवठा, विद्युत,आरोग्य विभाग व स्ट्रीट लाईट्स तसेच उद्यानांच्या देखभाल- दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे,असेही सूचित करण्यात आले.
दरम्यान,सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेबाबत व प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तसेच नागरिकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला.

या पाहणी दौऱ्यास नगरसेविका सौ अनिताताई काटे,नगरसेविका सौ कुंदाताई भिसे,श्री जयनाथशेठ काटे,श्री संजयशेठ भिसे,श्री संदिपशेठ काटे यांच्यासह संबंधित विभागांचे पालिका अधिकारी व कामांचे कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर्स) उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
33.1 ° C
33.1 °
33.1 °
43 %
3.6kmh
40 %
Sun
34 °
Mon
38 °
Tue
41 °
Wed
43 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments