36.8 C
New Delhi
Sunday, July 19, 2026
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता…

पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष खर्च व सदर खर्च थेट पद्धतीने करण्यास तसेच महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी तसेच महापालिकेच्या महापालिका स्थायी समिती बैठकीने आज मान्यता दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर,नगरसचिव मुकेश कोळप , अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नुकताच पद्मश्री मिळालेले ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा शहराच्या वतीने यांना जीवन गौरव पुरस्कार, पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सहभागी कलाकार, वक्ते, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्मृतीचिन्ह ,फ्लेक्स, विद्यार्थी, पत्रकार यांच्या करिता चहापान व भोजन व्यवस्था , पुस्तक खरेदी तसेच विविध माध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

तसेच महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची विनंती अर्जानुसार रजा मंजुरीच्या खर्चास देखील आजच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.8 ° C
36.8 °
36.8 °
35 %
3.2kmh
79 %
Sun
40 °
Mon
37 °
Tue
30 °
Wed
35 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments