30.5 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeदेश-विदेशआमदार महेश लांडगे यांच्या वतीने आरास सेवा

आमदार महेश लांडगे यांच्या वतीने आरास सेवा

महाकालेश्वर मंदिर समितीने मानले आभार

पिंपरी : मध्यप्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वर शिवलिंग गर्भगृह व कळसामधे असलेले श्री नागचंद्रेश्वर महादेव येथे नागपंचमीनिमित्त भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. मंदिराची सजावट, दिव्यांची रोषणाई केली. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.  महाकालेश्वर मंदिर समितीने आमदार लांडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मध्यप्रदेश उज्जैन येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराच्या माथ्यावर असलेल्या भगवान नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे वर्षभरानंतर नागपंचमीनिमित्त गरुवारी मध्यरात्री उघडण्यात आले. यानंतर महानिर्वाणी आखाड्याचे महंत विनीत गिरी महाराज यांच्या उपस्थितीत नागचंद्रेश्वराचे पूजन करण्यात आले. नेपाळमधून ही मूर्ती उज्जैनला आणण्यात आली. नागचंद्रेश्वर मंदिरात 11 व्या शतकातील एक अद्भुत मूर्ती आहे. ज्यामध्ये शिव आणि पार्वती नागाच्या आसनावर फणा पसरवून बसलेले आहेत. हा पुतळा नेपाळमधून येथे आणण्यात आल्याचे सांगितले जाते. उज्जैन वगळता जगात कुठेही अशी मूर्ती नाही. संपूर्ण जगात हे एकमेव मंदिर आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूऐवजी भगवान भोलेनाथ नागाच्या पलंगावर विराजमान आहेत. मंदिरात स्थापित केलेल्या प्राचीन मूर्तीमध्ये भगवान शंकर गणेश आणि माता पार्वतींसह दहा तोंडी नागाच्या पलंगावर विराजमान आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्या वतीने श्री महाकालेश्वर शिवलिंग गर्भगृह व कळसामधे असलेले श्री नागचंद्रेश्वर महादेव येथे नागपंचमीनिमित्त आकर्षक अशी फुलांची आरास सेवा करण्यात आली. त्याची संपूर्ण जबाबदारी संदीप पोटवडे, राकेश शहा, निलेश फुगे, विक्की आल्हाट यांनी पार पाडली. महाकालेश्वर मंदिर समितीने आमदार लांडगे यांचे आभार मानले.


पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यातील नागपंचमी हा पहिला सन आनंदात साजरा होत आहे. नागचंद्रेश्वर मंदिरात 11 व्या शतकातील एक अद्भुत मूर्ती आहे. ज्यामध्ये शिव आणि पार्वती नागाच्या आसनावर फणा पसरवून बसलेले आहेत. तिथे फुलांची आरास सेवा करण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल मंदिर समितीचे मनापासून आभार मानतो.
महेश लांडगे-आमदार भाजप, भोसरी विधानसभा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
30.5 ° C
30.5 °
30.5 °
72 %
2.5kmh
46 %
Sat
30 °
Sun
37 °
Mon
32 °
Tue
37 °
Wed
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!