नांदेड – गुरू गोविंदसिंह यांनी स्थापन केलेल्या शिख धर्मीयांचे पंच तख्त मधील हजूर साहिब गुरूद्वाराच्या आशिर्वादाने पूनीत झालेल्या व गोदावरीच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम झालेल्या अर्थ, उद्योग, सहकार, ऐतिहासिक, शैक्षणिक क्षेत्रात सर्वात अग्रेसर असणार्या मराठवाडा विभागातील महत्वाचे शहर असणार्या नांदेड येथे 1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या सुवर्ण दालनाचा भव्य शुभारंभ बुधवार दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 11.०७ वाजता चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक श्री अतुल जिनदत्त शहा व सौ. संगीता अतुल शहा व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत महात्मा फुले मार्केट, ITI कॉर्नर नांदेड येथे संपन्न होत आहे.

या निमित्ताने चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेडकरांना केले आहे. उद्घाटनानिमित्त दिनांक ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत रू. १५,०००/- पासून पुढील दागिने खरेदीवर अनेक बक्षिसे ग्राहकांना मिळण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये ६ लॅपटॉप, ३ स्कुटर, ५ मोबाईल, सारेगामा कारवान, खात्रीशीर व्हाऊचर्स, तसेच Rs. 3000 पासून योजनेतील गुंतवणुकीवर हुमखास भेटवस्तू मिळणार आहेत.
कृषी आणि उद्योगांचे महत्वाचे केंद्र असलेल्या आधुनिकता, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सहकार, धार्मिक वारसा लाभलेल्या नांदेड शहरात सुरू होणारी चंदुकाका सराफ ज्वेल्स् ची ही बारावी शाखा आहे. शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांची भरपूर व्हरायटी अशी विशेष वैशिष्ट्ये असणार्या या पेढीने ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून यशस्वी निरंतर वाटचाल करत आहेत.
समृध्द आणि सुजलाम-सुफलाम नांदेड शहरात पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून आता नांदेडचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी आम्ही येत आहोत. चंदुकाका सराफ ज्वेल्स् च्या माध्यमातून नांदेडकरांना साजश्रृंगारासाठी आता मिळणार उत्तमोत्तम आणि अभिनव पर्याय. नांदेडकरांचे व आमचे अतूट नाते निर्माण होईल असा विश्वास चंदुकाका सराफ ज्वेल्स् चे संचालक श्री अतुलकुमार शहा यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त नांदेडकरांनी घ्यावा असे आवाहन संचालक श्री सिध्दार्थ शहा यांनी केले आहे.