महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा विकास
पुणे-नाशिक महामार्गासह कासारवाडी नाशिक फाटा ते राजगुरुनगर यांना जोडणारा उन्नत रस्ता बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
नाशिक फाटा ते चाकण या 8 लेन एलिव्हेटेड हाय-स्पीड कॉरिडॉरला अर्थात उच्च गती उन्नत मार्गाला मंजूरी मिळाली असून महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील ही निश्चितच एक मोठी प्रगती आहे. 7 हजार 8 शे 27 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (बीओटी) अर्थात “ बांधा – वापरा – हस्तांतरित करा “ या तत्वावर राबविल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी 2 प्रकल्पाचे उद्दिष्ट मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमधील कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आहे.
अलिकडच्या वर्षांत नाशिक-पुणे कॉरिडॉरमध्ये झपाट्याने वाढ झाली असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले चाकण आणि भोसरी हे प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत आहेत, तथापि, NH-60 वरील जड वाहतुकीमुळे अडथळे निर्माण झाले आहेत ज्यामुळे प्रवासी आणि व्यवसाय दोघांनाही वेळ आणि संसाधनांचे मोठे नुकसान होते. चाकण एमआयडीसीमध्ये जगातील अनेक आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या सुविधा उभारल्या आहेत. उद्योग व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी यापूर्वी परिसरातील वाहतूक कोंडीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी सांगितले होते की, “पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक लक्षणीयरीत्या वाढली आहे. शिवाय, या मार्गावर चाकण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) वसलेले आहे. या भागातील वाहतुकीच्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अधिकाऱ्यांना नाशिक फाटा ते खेड दरम्यानच्या उन्नत महामार्गासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.”
नवीन उन्नत कॉरिडॉर या महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांमधील समर्पित हाय-स्पीड अर्थात उच्च गती मार्ग निर्मित करून वाढत्या वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी त्या अनुषंगाने याची रचना करण्यात आली आहे. गर्दी कमी करून, प्रवासाची कार्यक्षमता वाढवणे, इंधनाचा वापर कमी करणे आणि वाहतूक सुधारणे हे या प्रकल्पातून अपेक्षित आहे.
या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूकीची तीव्र कोंडी दूर होण्यास मदत होईल. टियर-1 येथे एका पिअरद्वारे समर्थित 8-लेन उन्नत उड्डाणपूल बांधून, सध्याच्या रस्त्याला 4 ते 6 लेन कॉन्फिगरेशन (एकत्रित ) मध्ये अपग्रेड करून आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2 लेन सर्व्हिस रोडची निर्मिती केली जाणार आहे.
विकासाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जाईल:
पॅकेज 1 मध्ये महाराष्ट्रातील NH-60 वर किमी 12.190 ते किमी 28.925 आणि पॅकेज 2 मध्ये किमी 28.925 ते किमी 42.113 पर्यंतचा मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. पूर्वीच्या प्रकल्प-आधारित पद्धतीऐवजी कॉरिडॉर-आधारित पध्दतीच्या माध्यमातून या बदलाचे उद्दिष्ट सातत्यपूर्ण मानके, वापरकर्त्यांची सोय आणि वाहतूक कार्यक्षम करणे असे आहे. या दृष्टिकोनामध्ये 50,000 किलोमीटरच्या हाय-स्पीड कॉरिडॉर अर्थात उच्च गती मार्गाचे जाळे समाविष्ट असून याला वाहतूक अभ्यासांचा वैज्ञानिक आधार आहे. 2047 पर्यंत $30+ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या उद्दिष्टाशी त्याला जोडण्यात आले आहे.