30.3 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeदेश-विदेशपुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार

पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार

*केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना मोठे यश

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याचे हे यश असून मनुष्यबळासंदर्भात मोहोळ यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांची गरज लक्षात घेत मोदी सरकारने नवे टर्मिनल साकारले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले होते. मात्र सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री शपथ घेतल्यानंतर लगेचच या प्रकरणी लक्ष घालून गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. शिवाय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. या प्रयत्नांना यश आले आहे.

याबाबत माहिती देताना मंत्री मोहोळ म्हणाले, ‘नवे टर्मिनल लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी केलेल्य प्रयत्नांना यश आले असून पुणे विमानतळासाठी २२२ विविध पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे वेगवेगळ्या ७ प्रकारांची आहेत. या नव्या संख्येसह पुणे विमानतळासाठी आता सीआयएसएफच्या मनुष्यबळाची संख्या ७१५ वर गेली आहे. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक असणारी संख्या आता पूर्ण झाली असून नवे टर्मिनल वापरात आणण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नाही. त्यामुळे हे टर्मिनल लवकरात लवकर खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनुष्यबळ पुरवण्याची मागणी गृहविभागकडून मान्य केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद मानतो’.

मंत्री मोहोळांमुळे आली पुणे विमानतळाच्या कामांना गती !

मंत्री मोहोळ यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी पुणे विमानतळाच्या प्रश्नांबाबत विशेष लक्ष घातले. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात पुणे विमानतळाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहे. यात धावपट्टी वाढवण्यासाठी शक्यता तपासणी सर्वेक्षणला (OLS) परवानगी मिळाली तसेच पार्किंग बेवर पार्क केलेले विमान संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले, या दोन्ही विषयांसदर्भात मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. आणि आता नवे टर्मिनल खुले होण्याचाहीमार्गही मोकळा झाला आहे. या तीनही प्रश्नांचा पाठपुरावा मोहोळ यांनी स्वतः केला होता.पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30.3 ° C
30.3 °
30.3 °
70 %
3.6kmh
94 %
Fri
38 °
Sat
42 °
Sun
37 °
Mon
36 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!