नवी दिल्ली : देशभरातील आठ अतिजलद महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. एकूण ९३६ किलोमीटर लांबीच्या या महामार्गांसाठी ५० हजार ६५५ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे देशभरात दळणवळणाची कार्यक्षमता आणि संपर्क अधिक सुलभ होईल असे सरकारतर्फे नमूद करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबद्दल ‘एक्स’वर माहिती देताना यामुळे देशातील रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्वास व्यक्त केला.
या प्रकल्पांअंतर्गत पुण्याजवळ ३० किलोमीटर लांबीचा उन्नत नाशिक फाटा – खेड महामार्ग बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर विकसित केला जाईल. यासाठी एकूण सात हजार ८२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे पुणे आणि नाशिकदरम्यान राष्ट्रीय महामार्ग ६०वरील चाकण, भोसरी इत्यादी भागांना जोडणाऱ्या वाहतुकीचा वेग वाढेल. तसेच, पिपरी-चिंचवडच्या आजूबाजूला वाहतुकीची गर्दी कमी होण्यासही मदत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. यामध्ये पुण्याजवळ 8-पदरी उन्नत नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरचा समावेश आहे.
पुण्याजवळ नाशिक फाटा ते खेड दरम्यान 30-किमीचा 8-पदरी उन्नत राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर विकसित केला जाईल. यासाठी 7,827 कोटी रुपये भांडवली खर्च येईल. उन्नत कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून जाणाऱ्या /येणाऱ्या वाहतुकीसाठी वेगवान हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या कॉरिडॉरमुळे पिंपरी-चिंचवडमधील मोठी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.