37.5 C
New Delhi
Tuesday, April 22, 2025
Homeदेश-विदेशमहाराष्ट्रात अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन

महाराष्ट्रात अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन

‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’चे आयोजन : सहभागासाठी १ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’ आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टार्टअप वीकमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक स्टार्टअप्सनी https://www.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन १ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

कौशल्य विकास दिंडीच्या निमित्ताने पुणे येथे आले असताना मंत्री श्री.लोढा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी व परिणामी प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’ हा राज्य शासनाचा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअपची नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवा शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत विजेत्या २४ स्टार्टअपना त्यांच्या उत्पादन तथा सेवेची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात.

कृषी, शिक्षण व कौशल्य, प्रशासनातील तंत्रज्ञान, आरोग्य, गतिशीलता, अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट पायाभूत सुविधा, शाश्वत क्षेत्र (स्वच्छ ऊर्जा,कचरा व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन) या क्षेत्रात काम करणारे स्टार्टअप यामध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे स्टार्टअप परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’ आजवर पाच वेळा यशस्वीपणे संपन्न झाला आहे. स्टार्टअप वीकच्या १२० विजेत्या स्टार्टअप राष्ट्रीय आरोग्य मिशन, महावितरण, मदत व पुनर्वसन विभाग, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत कार्यरत आहेत.

स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात लवकरच आयोजित करण्यात येणार असून याद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप वीकची व्याप्ती तसेच देशभरातील राज्याच्या स्टार्टअप परिसंस्था व गुंतवणूकदार यांच्यातील सहकार्याला चालना देणे, स्टार्टअपना गुंतवणुकीच्या संधी मिळवण्यास मदत करणे आणि देशभरातील स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि उद्योग तज्ज्ञांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील स्टार्टअप महासंमेलन महत्वपूर्ण ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत, इनक्युबेटर्सची स्थापना, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.msins.in तसेच team@msins.in या ईमेल वर संपर्क साधावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव गणेश पाटील, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
37.5 ° C
37.5 °
37.5 °
4 %
3.5kmh
0 %
Tue
40 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
43 °
Sat
43 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!