34.7 C
New Delhi
Monday, June 22, 2026
Homeदेश-विदेशदेशात किती दिवस पुरेल इतके पेट्रोल, डिझेल? केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर

देशात किती दिवस पुरेल इतके पेट्रोल, डिझेल? केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर

दिल्ली- इराण-इस्त्रायल युद्धाची झळ भारताला बसत असून, एलपीजीचा तुटवडा निर्माण झालेला असताना परिस्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात पेट्रोल, डिझेलचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान भारतात पुरेसा इंधन साठा आहे आणि उपलब्धतेबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं आहे. संसदेत राहुल गांधींना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.


आपण अमेरिकेच्या इशाऱ्यावर तेल खरेदी करणार का?
राहुल गांधींनी संसदेत गॅस संकटाचा मुद्दा उपस्थित केला. ”अमेरिका आपल्याला कोणाकडून तेल खरेदी करायचे ते सांगत आहे. अमेरिका भारताचे निर्णय घेत आहे. आपण अमेरिकेच्या इशाऱ्यावर तेल खरेदी करणार आहोत का? आपण रशियाकडून तेल का घेऊ शकत नाही? देशात एलपीजीचं संकट निर्माण झालं आहे”.
भाजपा खासदार संजय जायस्वाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावर म्हटलं की, ”चिंतेची कोणतीही बाब नाही. भारतात ना गॅसची कमतरता भासणार आहे, ना पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होणार आहे”.
”गेल्या पाच दिवसांत, रिफायनरींना दिलेल्या निर्देशानुसार एलपीजी उत्पादनात २८ टक्के वाढ करण्यात आली आहे आणि प्रत्यक्षात पुढील खरेदी सुरू आहे. मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता भारतातील ३३ कोटी कुटुंबांना, विशेषत: गरीब आणि वंचितांना, कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये अशी प्राथमिकत आहे. देशांतर्गत पुरवठा पूर्णपणे संरक्षित आहे आणि डिलिव्हरी सायकलही बदलण्यात आलेली नाही,” असं त्यांनी सांगितलं आहे.
”अफवा पसरवण्याचा किंवा खोट्या गोष्टी सांगण्याची ही वेळ नाही. भारत इतिहासातील सर्वात गंभीर जागतिक ऊर्जा व्यत्ययाचा सामना करत आहे. फळांचा पुरवठा सुरू आहे, घरे आणि शेतांसाठी गॅसला प्राधान्य दिले जात आहे, एलपीजी उत्पादन २८ टक्क्यांनी वाढलं आहे. भारताने ऊर्जा योद्ध्यांच्या मागे, संकटाचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेच्या मागे आणि राष्ट्रीय हिताच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.
भारतात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही: हरदीप पुरी
राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले की देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही. ते म्हणाले, ”आपल्याकडे पुरेसा गॅस आणि तेल आहे. भारत अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संकटामुळे तेल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भारतात पुरेसे कच्चे तेल आहे.”
”गॅस सिलिंडरबद्दल घाबरण्याची गरज नाही.”
पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले, ”होर्मुझच्या सामुद्रधुनीतून २० टक्के वाहतूक प्रभावित झाली आहे. देशात अजूनही पुरेसा गॅस आहे. गॅस सिलिंडरबद्दल घाबरण्याची गरज नाही. सीएनजीचा पुरवठा १०० टक्के केला जात आहे.”
‌’होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी खुली आहे‌’
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री म्हणाले की भारत या संकटाचा सामना बराच काळ करू शकतो. एलपीजी उत्पादन २८ टक्क्यांनी वाढले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी खुली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
34.7 ° C
34.7 °
34.7 °
35 %
6.4kmh
75 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
41 °
Thu
41 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments