33.1 C
New Delhi
Saturday, April 18, 2026
Homeमहाराष्ट्रअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या नांदेड सिटी शाखेची पदाधिकारी बैठक सारंग सोसायटीत संपन्न

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या नांदेड सिटी शाखेची पदाधिकारी बैठक सारंग सोसायटीत संपन्न



नांदेड सिटी व आजूबाजूच्या भागातील सुमारे 40 ते 45 ब्राह्मण पदाधिकारी उपस्थित होते.

ब्राह्मण समाजातील मुलांचे विवाह प्रश्न, युवा पिढी सक्षम करण्यासाठी कुटुंबप्रबोधन, एकत्रिकरण, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम या विषयांवर चर्चा व निर्णय झाले.

आपल्या संस्कारांपासून, कुटुंबापासून दुरावलेली युवा पिढी यांना संस्कार सक्षम बनवण्यासाठी आवश्यक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मंदार रेडे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची ध्येय उद्दिष्टे व संघटनात्मक माहिती सांगितली व आवाहन केले की जास्तीत जास्त ब्राह्मण लोकांनी संघटनेशी व शाखेशी जोडून घ्यावे.

श्री नितीन जी फडणीस यांनी उपस्थितांचे स्वागत केले व रमेश जी बाडगंडी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे च्या ठिकाणासाठी श्री संजीव नाईक यांनी सहकार्य केले.

सगळ्यांचा उत्साह व समाजाप्रती असलेली तळमळ व कार्य करण्याच्या इच्छेमुळे एक उत्तम संघटन या भागात बांधले जाईल याची खात्री वाटते.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नांदेड सिटी शाखा पदाधिकारी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
33.1 ° C
33.1 °
33.1 °
33 %
3.6kmh
76 %
Sat
40 °
Sun
41 °
Mon
40 °
Tue
41 °
Wed
42 °

Most Popular

Recent Comments