31.1 C
New Delhi
Tuesday, April 21, 2026
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत शहासने भूषविणार अध्यक्ष पद

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत शहासने भूषविणार अध्यक्ष पद

कविता या विषयाला वाहिलेले दुसरे राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन १५ मार्च रोजी


पुणे, : काव्यमित्र संस्था पुणे आणि अपेक्षा मासिक परिवार यांच्या वतिने कविता या विषयाला वाहिलेले ‘दुसरे राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन २०२६’ हे रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत नवी पेठ, गांजवे चौक येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आले आहे. दुसर्‍या राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा देशभक्तकोषकार चंद्रकांत शहासने हे असतील. अशी माहिती अपेक्षा मासिक परिवारचे संस्थापक संंपादक दत्तात्रय उभे आणि काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या समेलनाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय जगताप आणि उद्घाटक प्रसिद्ध उद्योजक व साहित्यप्रेमी प्रमोदकुमार बेलसरे असतील. समाजसेवक नंदकुमार वाळंज उर्फ बाबुजी, पहिल्या काव्यविश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे, स्वागताध्यक्ष सुरेश कोते, समाजसेवक सुरेशभाऊ लुणावत, संत तुकाराम सह. साखर कारखानाचे संचालक अंकुश उभे आणि पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात जीवन गौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार आणि विशेष कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. तसेच निमंत्रितांचे हास्य कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी बंडा जोशी भूषवतील. यावेळी बाळकृष्ण बाचल, अरविंद सगर, गणेश पुंडे, देवेंद्र गावंडे, तरुजा भोसले-वळसंगकर आपल्या हास्य कविता सादर करतील.
काव्यविश्व साहित्य संमेलनात सकाळी १० ते ११.३० दरम्यान स्वागत, उद्घाटन, प्रास्ताविक, स्मरणिका प्रकाशन, स्वागताध्यक्षांचे व संमेलनाध्यक्षांचे भाषण होईल. तिसर्‍या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होईल. याचे अध्यक्षस्थान साहित्यिक व व्याख्याते प्रा. विजय लोंढे भूषवतील. यामध्ये निमंत्रित कवी व कवयित्री वेगवेगळ्या विषयांवरील आपल्या कवितांचे सादरीकरण करतील. तसेच नंतरच्या सत्रात मराठी काव्य विश्वातील संत साहित्याचे महत्व या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे अध्यक्षस्थान संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. लता पाडेकर-मुळे असतील. तसेच नामवंत वक्ते डॉ. पांडूरंग कंद व गझलकार आणि ज्येष्ठ विचारवंत संजय पठाडे हे परिसंवादात मनोगत व्यक्त करतील.
हे संमेलन सर्वांसाठी आनंदोत्सव असल्याचे श्री उभे व श्री सगर यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त श्रोत्यांनी याचा आनंद घ्यावा.असे आवाहन केले आहे.

काव्यमित्र संस्था पुणे आणि अपेक्षा मासिक परिवार

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
30 %
2.6kmh
0 %
Tue
35 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °
Sat
45 °

Most Popular

Recent Comments