पुणे, – गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापकांनी शिक्षणक्षेत्रात दिलेले मोलाचे योगदान आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील भूमिका लक्षात घेऊन या कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे होते. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून अधिसभा सदस्य आदरणीय प्रा. सुरेंद्र निरगुडे सर उपस्थित होते. तसेच प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पंडित डॉ. विकास कशाळकर, प्रसिद्ध लेखिका व माजी प्राचार्य डॉ. अश्विनी धोंगडे मॅडम आणि प्रसिद्ध लेखिका व माजी प्राचार्य डॉ. रेवा कुलकर्णी मॅडम यांना निमंत्रित करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या दीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करत त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुरेल गायनाने जिंकली उपस्थितांची मन:पूर्वक दाद
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाविद्यालयाच्या संगीत विभागातील विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी सादर केलेला सुरेल गायनाचा कार्यक्रम. भक्तिगीते, गुरुस्तवन आणि विविध भावगीतांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या संगीतमय प्रस्तुतीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
ज्ञानदानाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा: प्रा. सुरेंद्र निरगुडे
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूचे स्थान, ज्ञानदानाचे महत्त्व आणि आजच्या काळात संस्कारक्षम शिक्षणाची असणारी गरज यावर प्रकाश टाकला. गुरूंच्या ऋणाची सदैव जाणीव ठेवून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी उत्तमरीत्या सांभाळले, तर उपस्थितांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विजयकुमार भवारी सर यांनी मानले. गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करत या सोहळ्याची सांगता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी प्राध्यापक, विद्यार्थिनी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस.एन.डी.टी. महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त सेवानिवृत्त गुरुजनांचा विशेष सन्मान
RELATED ARTICLES
New Delhi
broken clouds
33.3
°
C
33.3
°
33.3
°
51 %
3.1kmh
74 %
Wed
33
°
Thu
37
°
Fri
36
°
Sat
37
°
Sun
32
°


