6.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रगणपती-गौरी सजावट व प्रसाद स्पर्धेचे मालपाणीज् बेकलाईट करणार आयोजन

गणपती-गौरी सजावट व प्रसाद स्पर्धेचे मालपाणीज् बेकलाईट करणार आयोजन

  • प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिवस – १७ सप्टेंबर २०२४
  • विजेत्यांना मिळणार एकूण १५ रोमांचक बक्षिसे

पुणे: अन्न प्रक्रिया आणि बेकरी क्षेत्रातील अग्रगण्य व विश्वासार्ह ब्रँड असलेल्या मालपाणीज् बेकलाईटने ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या श्री गणेशोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून पुणे आणि महाराष्ट्रातील सर्व परिवारांसाठी एका आकर्षक गणपती सजावट स्पर्धेची आज घोषणा केली.

गणेशोत्सवाच्या जल्लोषाचा एक भाग म्हणून, मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने संपूर्ण उत्सवकाळात स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. “गणपती – गौरी सजावट आणि प्रसाद!” ही या स्पर्धेची मुख्य संकल्पना आहे. गणेशोत्सव हा पुण्याच्या समृद्ध संस्कृतीची शान असून या ऐतिहासिक आणि पारंपारिक उत्सवाला हा ब्रँड पाठिंबा देत आहे. या सजावटीच्या रूपाने आणि प्रसादाच्या स्वरूपात आपला समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे प्रतिबिंब पडेल अशा सर्जनशीलतेचा वापर करून प्रत्येकाने संस्मरणीय क्षण निर्माण करावेत, यासाठी हा ब्रँड प्रोत्साहन देतो.

प्रत्येकाने गणेशोत्सव अगदी पारंपारिक स्वरूपात साजरा करावा, यासाठी प्रामुख्याने प्रोत्साहन देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीने गणपती / गौरींना अर्पण केलेल्या नैवेद्य / प्रसादाचा भाग असलेल्या कडबोळी, चकली, चिरोटे, शंकरपाळी आणि चिवडा इत्यादी उत्पादनांची विस्तृत श्रेणी बाजारात आणली आहे.

ही स्पर्धा सर्व व्यक्तींसाठी आणि कुटुंबांसाठी खुली असून ती फक्त घरी केलेल्या गणपतीच्या सजावटीसाठी लागू आहे. क्लब हाऊस किंवा मंडळांमध्ये केलेली सजावट प्रवेशिका म्हणून स्वीकारली जाणार नाही. ही स्पर्धा ७ सप्टेंबर २०२४
रोजी सुरू होईल आणि १७ सप्टेंबर २०२४ रोजी संपेल.

सहभागाची प्रक्रिया:
• स्पर्धकांनी आपल्या गणपतीच्या सजावटीचे फोटो किंवा व्हिडिओ फेसबुक / इंस्टाग्राम /व्हॉट्सॲप वर तारीख आणि टाइम स्टॅम्पसह सबमिट करणे आवश्यक आहे.

  • स्पर्धकांनी आपले नाव, संपर्क तपशील आणि सजावटीचे संक्षिप्त वर्णन नमूद करावे.
  • प्रति व्यक्ती किंवा कुटुंबाला केवळ एक प्रवेशिका सादर करता येईल.
    •सबमिशन पूर्ण करण्यासाठी सहभागींनी मालपाणीज् बेकलाईटच्या सोशल मीडिया पेजेसला फ़ॉलो करत असल्याचे निश्चित करावे. आपल्या पोस्टमध्ये आमच्या अधिकृत खात्यांना टॅग केले असल्याची खात्री करा. सहभागासाठी सोशल मीडिया हँडल:
    •इंस्टाग्राम हँडल – malpanis_bakelite
    •फेसबुक हँडल – Malpani’s Bakelite

    • पोस्टसाठी हॅशटॅग: #mybappa #mybappaandme #mybappaandprasad #mybappasblessings #bappakaprasad #mybappaandsajawat

सर्जनशीलता, पर्यावरणास अनुकूल सामग्रीचा वापर आणि संकल्पनेचा आधार या निकषांवर स्पर्धकांची निवड केली जाईल.

बेकलाईट फूड प्रोसेसिंग प्रा. लिमिटेडबद्दल: बेकलाईट फूड प्रोसेसिंग प्रा. लिमिटेड हे फूड इंडस्ट्रीतील एक अग्रगण्य नाव असून तिचे मुख्यालय पुण्यात आहे. उद्योजक श्री. सचिन मालपाणी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली १९९९ मध्ये कंपनीची स्थापना झाली. मागील दोन दशकांहून अधिक काळ ती बाजारपेठेत सक्रिय आहे. या ब्रँडच्या अंतर्गत शुद्ध शाकाहारी उत्पादने उपलब्ध आहेत. दर्जेदार उत्पादने प्रदान करण्यावर त्याचा विश्वास आहे. तसेच आपल्यामध्ये सतत सुधारणा करण्यासाठी कंपनी कठोर परिश्रम घेते. हा ब्रँड केवळ बेकरी उत्पादनांपुरता मर्यादित राहिला नसून नमकीन स्नॅक्स श्रेणीमध्येही त्याचा प्रवेश झाला आहे. ही उत्पादने कठोर गुणवत्ता तपासणीतून जातात आणि अत्यंत स्वच्छ वातावरणात त्यांचे उत्पादन करण्यात येते. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो. पुण्यातील नऱ्हे येथील कारखान्यात सर्व उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचे पॅकिंग करण्यात येते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
6.1 ° C
6.1 °
6.1 °
93 %
2.1kmh
0 %
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
21 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!