6.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रझंझावाती पदयात्रा आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या जीप यात्रेने कसब्यातील वातावरण धंगेकरमय!

झंझावाती पदयात्रा आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या जीप यात्रेने कसब्यातील वातावरण धंगेकरमय!

पुणे- कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या सध्या झंझावाती पदयात्रा सुरू आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची जीप यात्रा झाली. या जीप यात्रेत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते दुचाकींवरून सहभागी झाले होते. या झंजावाती प्रचारामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील सगळेच वातावरण धंगेकरमय झाल्याचा अनुभव आला.

आज सकाळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सूर्या हॉस्पिटलपासून जीप यात्रेला प्रारंभ केला. त्यानंतर ही यात्रा पवळे चौक, कुंभारवाडा, गावकोस मारुती, हमजे खान चौक, अशोक चौक, रामोशी गेट, गोकुळ वस्ताद तालीम, घसेटी पूल या मार्गावर काढण्यात आली. जीप यात्रेत खा. सुप्रिया सुळे आणि उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, विशाल धनवडे, राजेंद्र शिंदे, गणेश नलावडे, संदीप गायकवाड इत्यादी सहभागी झाले होते. या जीप यात्रेचे जागोजागी जोरदार स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीप्रमाणेच एकजूट दाखवून पुन्हा एकदा विजय खेचून आणावा आणि धंगेकर यांना विजयी करावे, असे आवाहन खा. सुप्रियाताई सुळे यांनी केले.

दरम्यान काल रवींद्र धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक १६ म्हणजेच आपल्या होमपीचवर पदयात्रा काढली. त्या पदयात्रेलाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ही पदयात्रा दारूवाला पूल, नागेश्वर मंदिर, त्रिशुंड्या गणपती, कागदीपुरा, साततोटी चौक,भोई आळी,पवळे चौक, कसबा गणपती, फणी आळी आदी भागातून काढण्यात आली. फणी आळी परिसरात राजेंद्र खराडे, मामासाहेब मोहोळ यांनी पदयात्रेचे स्वागत केले.वाटेत ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळे व स्थानिक नागरिकांनी धंगेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत वातावरण काँग्रेसमय करून टाकले.या पदयात्रेत मुख्तार शेख, नरेश नलावडे, नागेश खडके,भोकरे कुटुंबीय, दातार कुटुंबीय, तसेच या परिसरातील असंख्य जुने वाडे आणि सहकारी गृहरचना संस्थांमधील नागरीक मोठ्या संख्येने पदयात्रेचे स्वागत करताना दिसले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
6.1 ° C
6.1 °
6.1 °
100 %
2.1kmh
0 %
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!