35.4 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
Homeमहाराष्ट्रधामणीत खंडोबाला हरिद्रागंध उटी आंबा फळ फुलाची आरास

धामणीत खंडोबाला हरिद्रागंध उटी आंबा फळ फुलाची आरास

मंचर : धामणी(तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई.व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्यांचा वासंतिक हरिद्रागंधउटी(हळद) व आंबा फळ फूल सोहळा उत्साहात रविवारी(३१मे२६) साजरा झाला.अधिक जेष्ठ पौर्णिमेनिमित्त पारंपारिक हरिद्रागंधउटी सोहळ्यासाठी झेंडू.अष्टर.गुलाब.मोगरा आणि शुध्द हळदीचा वापर करण्यात आला. वाढत्या उन्हापासून देवाला थंडावा मिळावा,या भावनेतून स्वयंभू सप्तशिवलिंगाला व मुखवट्यांना हरिद्रागंधाचा (हळदीचा) लेप लावून गाभार्‍यात सुगंधी फुलांची व आंब्याच्या फळांची आरास करण्यात आली होती.

यामुळे मंदिर परिसर भक्तिने आणि सुगंधाने न्हाऊन निघाले होते. अधिक महिण्यातील पौर्णिमेच्या मुहर्तावर रविवारी (३१मे२६) शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.अधिक जेष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने खंडेरायाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगावर सरत्या चैञ व वैशाख व जेष्ठ महिण्यातील वसंत व ग्रीष्म ॠतुतील पाचवी व अंतीम वासंतिक हरिद्रागंधउटी साकारण्यात आली.खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या व स्वयंभू सप्तशिवलिंगावर साकारलेल्या हरिद्रागंधटीचे मनमोहक रुप पाहाण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

तत्पूर्वी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद झाला.त्यानंतर चंद्रकांत शेवाळे व लता शेवाळे (मंचर),विजय फुलसुंदर व कुंदा फुलसुंदर (अवसरी बुद्रुक).दिलखूष जाधव व वंदना जाधव (शिक्रापूर)ज्ञानेश्वर भुमकर व मिरा भुमकर (मुंबई).दत्ता विधाटे व माधुरी विधाटे (चाकण).राजेंद्र बढेकर व शारदा बढेकर (लोणी).कैलास जाधव व रुपाली जाधव (धामणी)राजेंद्र घोलप व मंगल घोलप (देवमळा)दिलीप सोनवणे व संगिता सोनवणे (धामणी) या ९ जोडप्यांच्या हस्ते वसंत पूजा व दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला.खंडेराय म्हाळसाई बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार व सुंगधी फुलांचे हार घालण्यात आल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.नामदेव भगत.राजेश भगत.राहूल भगत.अनिरुध्द वाळूंज. यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित हरिद्रागंध हळदीचा लेप देण्यात आला.त्यानंतर खंडेरायाला अनारस्याचा नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.सुवासिक हरिद्रागंधाचे लेपन करत असताना मंदिराच्या आवारात पारंपारिक वाद्याचा गजर सुरु होता.पौर्णिमेच्या अभिषेकाचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले. वसंत ॠतुच्या उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्‍यात व सभामंडपात झेंडू.गुलाब.अष्टरच्या फुलांची सजावट मुंबई व चाकण येथील भाविक ज्ञानेश्वर भुमकर व दत्ता विधाटे यांच्या सौजन्याने केलेली होती.मंदिराचे आवारात व सभोवताली भल्या पहाटे महिला भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या.पहाटे मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाला हरिद्रागंधाच्या उटीचे लेपन केल्यानंतर उपस्थित भाविकांच्या कपाळाला भंडारा लावण्यात आला.वासंतिक हरिद्रागंधउटी सोहळ्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले अधिक महिण्यातील पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी पुणे.नगर.पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील भाविक व नवविवाहीत जोडपी कुटुंबियासह आलेले दिसत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.4 ° C
35.4 °
35.4 °
25 %
3.3kmh
48 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
39 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments