25.1 C
New Delhi
Tuesday, April 14, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानद्वारकाधीश रेसिडेन्सीत सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

द्वारकाधीश रेसिडेन्सीत सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

पिंपळे सौदागर : येथील द्वारकाधीश रेसिडेन्सीमध्ये सोशल मीडिया वापर व सायबर फसवणूक या विषयावर जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सांगवी पोलीस स्टेशनचे सीनियर पीआय श्री. दिव्यांश नांदेकर यांनी रहिवाशांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिक, महिला व सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून ‘डिजिटल अरेस्ट’ व आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमासाठी चेअरमन श्री. भटुलाल बागुल, सचिव श्री. रविकिरण हिल्लाळ व खजिनदार श्री. तांबोळी यांनी पुढाकार घेतला. यावेळी रो हाऊसचे चेअरमन श्री. संजीव अन्नेगीरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमात कमिटी मेंबर्स, ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.1 ° C
25.1 °
25.1 °
36 %
1kmh
17 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
41 °
Sat
39 °

Most Popular

Recent Comments