पुणे, : ओप्पो इंडियाने आज भारतात ओप्पो एफ ३३ सीरिजच्या लॉन्चची घोषणा केली, ज्यामध्ये ओप्पो एफ ३३ प्रो ५जी आणि ओप्पो एफ ३३ ५जी समाविष्ट आहेत. एफ ३३ सीरिज ही आजपर्यंत ओप्पोच्या एफ लाईनमधील सर्वात महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते, ज्यात सेगमेंटमधील सर्वोत्तम ५०एमपी अल्ट्रा-वाइड सेल्फी कॅमेरा,आयपी६९के टिकाऊपणा, प्रचंड ७००० एमएएच बॅटरी, कलरओएस १६,आणि ५जी ++ कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.
लाँचबद्दल प्रतिक्रिया देताना ओप्पो इंडिया येथील कम्युनिकेशन्स प्रमुख गोल्डी पटनायक म्हणाले, “ एफ सिरीजने भारताचा ‘ड्युरेबल चॅम्पियन’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे—एक असा स्मार्टफोन जो खऱ्या आयुष्यासाठी बनवलेला आहे. एफ ३३ सिरीज ही वचनबद्धता कायम ठेवते आणि त्यात १००° एफओव्ही असलेला सेगमेंटमधील सर्वोत्तम ५०एमपी अल्ट्रा-वाइड सेल्फी कॅमेरा आणि एआय इमेजिंग फीचर्सचा संच जोडून नवा मापदंड निर्माण करते.
ओप्पो च्या विद्यमान एआय फोटोग्राफी क्षमतांवर आधार घेत, ही सीरिज एआय रीकम्पोझ, एआय परफेक्ट शॉट, एआय लाईव्ह २.०,एआय बेस्ट फेस, एआय अनब्लर, एआय स्टुडीओ,एआय रिफ्लेक्शन रिमुवर आणि एआय इरेझर यांसारखी परिचित साधने देत राहते, ज्यामुळे वापरकर्त्यांना क्षण सहजपणे सुधारता, उन्नत करता आणि पुन्हा फ्रेम करता येतात. एकत्रितपणे, ही वैशिष्ट्ये एक अखंड, एआय -प्रथम संपादन अनुभव देतात जो वापरकर्त्यांना कमीत कमी प्रयत्नात शेअर-करण्यासाठी तयार परिणाम मिळविण्यास मदत करतो.
संरचनात्मक स्तरावर, एफ ३३ सिरीज ही आपल्या सेगमेंटमधील पहिली स्मार्टफोन आहे जी वन-पिस कोल्ड कार्विंग डिझाइन सादर करते, ज्यामुळे एकसंध उच्च-चमकदार कॅमेरा प्लॅटफॉर्म तयार होतो, जो मॅट सॉफ्ट-टच सभोवतालच्या भागाशी विरोधाभास निर्माण करतो, आणि हे सर्व एका सिंगल युनिबॉडी तुकड्यावर असलेल्या त्वचेसाठी अनुकूल हार्ड कोटिंगने एकत्र जोडलेले आहे.
या मालिकेमध्ये ६.५७ इंचाचा फ्लॅट अमोलेड डिस्प्ले आहे ज्यामध्ये १२० एचझेड स्मार्ट अॅडॅप्टिव रिफ्रेश, १४०० एनआयटीएसची लोकल पीक ब्राइटनेस, ९३.५ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो, १.७ एमएम अल्ट्रा-थिन बेजल्स,आणि एजीसीडीटी स्टार डी+ स्क्रीन प्रोटेक्शन आहे. प्रो व्हेरिएंट तीन रंगछटांमध्ये उपलब्ध आहे: मिस्टी फॉरेस्ट, ज्यामध्ये इंडस्ट्री-फर्स्ट डायनामिक ३डी डेफ्थ कोटिंग आहे, जे हालचालीसोबत दृश्य खोली बदलते; पॅशन रेड, सुपरकार मेटल फिनिशपासून प्रेरित; आणि स्टेअरी ब्ल्यू एक खोल, चंद्रप्रकाशासारखा फिनिश जो हातात शांत आणि कालातीत भासतो. ओप्पो एफ ३३ पर्ल व्हाईट आणि फॉरेस्ट ग्रीन मध्ये उपलब्ध आहे.
किंमत आणि उपलब्धता :
ओप्पो एफ ३३ प्रो ५जी : ८ जीबी + २५६ जीबी – रु.४०,९९९ आणि ८ जीबी + १२८ जीबी रु.३७,९९९
ओप्पो एफ ३३ ५जी ८ जीबी + २५६ जीबी रु.३७,९९९, ८ जीबी + १२८ जीबी रु.३४,९९९ आणि ६जीबी + १२८ जीबी रु.३१,९९९
ग्राहक खालील ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात:
·प्री-बुकिंग आणि पहिल्या दिवशी खरेदी करणाऱ्यांना बँक सवलती किंवा एक्सचेंज बोनस मिळतील, ज्यामुळे सर्व तीन मॉडेल्सवर प्रभावी किंमती कमी होतील.
·१८० दिवसांचे मोफत अपघाती नुकसान संरक्षण, द्रव नुकसान संरक्षण आणि मोफत स्क्रीन नुकसान संरक्षण, ओप्पो इंडिया निवडक बँक कार्डांवर १० टक्के पर्यंत तात्काळ कॅशबॅक, ६ महिन्यांपर्यंत कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय ईएमआय सुविधा उपलब्ध, निवडक आघाडीच्या वित्तसंस्थांवर शून्य डाउन पेमेंटसह, पेपर फायनान्स ईएमआय १२ महिन्यांपर्यंत. आणि ग्राहक १० टक्के पर्यंत एक्सचेंज बोनसचा देखील लाभ घेऊ शकतो शकतात.
ओप्पो देखील ७२-महिन्यांची फ्ल्युएन्सी प्रोटेक्शन प्रणाली देते, जी सहा वर्षांपर्यंत नवीनसारखी कार्यक्षमता सुनिश्चित करते, तर आउट डोअर मोडमधील उद्योगातील पहिली क्विक स्वीच बार (अॅप हब) सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्सना एका एकत्रित उत्पादकता हबमध्ये संकलित करते.
कलरओएस १६ मध्ये ओप्पो ची एआय वैशिष्ट्ये येतात, जसे की एआय अल्ट्रा क्लीअर डॉक्यूमेंट स्कॅनर, एआय च्या मदतीने टेक्स्टची स्पष्टता वाढवून, दोष काढून टाकणे, नॉईज रिडक्शन आणि कर्व्ह करेक्शनसह एका क्लिकमध्ये डॉक्युमेंट स्कॅनिंग. एआय रेकॉर्डर आपोआप सारांश तयार करतो, एआय रायटर नोट्स आणि सोशल अॅप्समध्ये लेखनासाठी मदत करतो. गुगल जेमिनीसोबतची डीप इंटिग्रेशन नैसर्गिक भाषेतील कमांड्सद्वारे सेटिंग्ज, कॅलेंडर आणि क्लॉक सारख्या दैनंदिन फंक्शन्स नियंत्रित करण्यास सक्षम करते. ओलॉक हे एक फीचर आहे जे चोरीपासून संरक्षणासाठी सिस्टमला रिमोटली लॉकडाऊन करते, ज्यामुळे फोर्स्ड एक्झिट, यूएसबी डेटा चोरी, फर्मवेअर फ्लॅशिंग रोखले जाते आणि डिव्हाइस हरवल्याचे रिपोर्ट केल्यावर एनएफसी निष्क्रिय करते.


