23.1 C
New Delhi
Tuesday, April 14, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिका ट्रॅक्टर्सची आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,८०,५०४ ट्रॅक्टर्सच्या विक्रमी विक्रीची नोंद

सोनालिका ट्रॅक्टर्सची आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,८०,५०४ ट्रॅक्टर्सच्या विक्रमी विक्रीची नोंद

शेतकऱ्यांचा कंपनीवरील वाढता विश्वास, तसेच विविध प्रदेशांमधील शेतीविषयक विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीची सज्जता आणि बळकट समन्वय हेसुद्धा या अचंबित करणाऱ्या कामगिरीतून अधोरेखित झाले आहेत

पुणे : भारताचा क्रमांक १ चा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या ‘सोनालिका ट्रॅक्टर्स’ने तिच्या ३० व्या गौरवशाली वर्षात एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,८०,५०४ ट्रॅक्टर्स एवढ्या आजवरच्या सर्वोच्च विक्रीची नोंद केली आहे. कंपनीचे शिस्तबद्ध कार्यान्वयन, ‘शेतकरी-प्रथम’ दृष्टिकोन आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत व ‘हेवी-ड्यूटी’ ट्रॅक्टर्स पुरवण्यावर असलेला सततचा भर यांचे प्रतिबिंब दर्शविणारी अशी ही कामगिरी आहे. शेतकऱ्यांचा कंपनीवरील वाढता विश्वास, तसेच विविध प्रदेशांमधील शेतीविषयक विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीची सज्जता आणि बळकट समन्वय हेसुद्धा या अचंबित करणाऱ्या कामगिरीतून अधोरेखित झाले आहेत.

एकीकडे जागतिक वातावरण आव्हानांनी भरलेले असतानाच्या काळातही सोनालिकाने आपल्या ‘जगातील क्रमांक १ च्या ट्रॅक्टर निर्मिती प्रकल्पा’मध्ये केंद्रित कार्यान्वयन,उत्पादनातील नावीन्य आणि उत्कृष्ट उत्पादन प्रक्रियेच्या माध्यमातून जबरदस्त गती कायम राखली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील कंपनी उत्साहवर्धक उत्पादनांचे लाँचिंग करणार आहे. त्या बळावर सोनालिका तिची ‘संशोधन आणि विकास’ क्षमता अधिक बळकट करण्यास सज्ज झाली आहे. त्यातून भविष्यातील विकासाला चालना देण्यासाठी अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतील.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, “आमच्या महत्त्वपूर्ण अशा या ३० व्या वर्षात आमचा ‘जीतने का दम’ खऱ्या अर्थाने साकार झाला आहे, आम्ही वितरित केलेला प्रत्येक ट्रॅक्टर शेतकऱ्यांना सक्षम करण्याची आमची जिद्द आणि समाधान न मानण्याच्या आमच्या वृत्तीचे प्रतीक आहे, कारण उत्कृष्टतेच्या शोधात आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आमच्या ‘शेतकरी प्रथम’ या तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ राहून आणि आर्थिक वर्ष २०२६ मधील दमदार उत्पादन लाँचच्या जोरावर आम्ही आमच्या संशोधन आणि विकास क्षमता अधिक मजबूत करत आहोत. त्यातून आमच्या शेतकरी समुदायाला आणखी प्रगत उपाययोजना देण्याचा आमचा मानस आहे.

आमचे डीलर भागीदार, विविध विभागांतील टीम्स आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. त्यांच्या विश्वासावरच आमचे सर्व कार्य आधारलेले आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी असलेल्या अढळ कटिबद्धतेसह आम्ही नवनवीन सीमा ओलांडत राहू. कारण ही तर फक्त सुरुवात आहे आणि ‘आता थांबायचे नाही’. सर्वोत्तम काळ अद्याप यायचाच आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
41 °
Sat
41 °

Most Popular

Recent Comments