पिंपरी-चिंचवड :
शहरातील मानाची व पारंपरिक म्हणून ओळखली जाणारी अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित या महोत्सवात मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथका’ने दहिहंडी फोडण्याचा मान पटकावला.

🎶 पारंपरिक सुरुवात
या दहिहंडी महोत्सवाची सुरुवात चिंचवडगावातीलच श्री छत्रपती शिवाजी उदय मंडळाच्या ‘शिवोदय’ ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली.
🤸 गोविंद पथकांचे थरारक सादरीकरण
नवी मुंबई, गोवंडी आणि चेंबूर येथील गोविंदा पथकांनी चित्तथरारक कसरतींचे प्रदर्शन केले.
यामध्ये मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकाने अंतिम फेरीत दहिहंडी फोडून मानाचा किताब जिंकला.
💰 भव्य बक्षीस वितरण
विजयी पथकाला स्मृतीचिन्हासह ₹५,५५,५५५ चे भव्य बक्षीस भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार अमितजी गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले व ज्येष्ठ नेते पै. ज्ञानेश्वर आप्पा शेडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

🎭 सेलिब्रिटींची उपस्थिती
या दहिहंडी उत्सवाला सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शहरातील तरुणाई मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी झाली.
🏅 विशेष सन्मान
या प्रसंगी भाजप शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शत्रुघ्न (बापूसाहेब) काटे, विधान परिषदेच्या तालिका सभापदी निवड झाल्याबद्दल आमदार अमितजी गोरखे आणि चिंचवडचे सुपुत्र तसेच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेले समीरजी कुलकर्णी यांचा उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

👥 मान्यवरांची उपस्थिती
या दहिहंडी महोत्सवाला राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यात पै. ज्ञानेश्वर शेडगे, दत्ताभाऊ चिंचवडे, कुणाल साठे, राहुल कलाटे, राजाभाऊ गोलांडे, चंद्रकांत नखाते, शितल शिंदे, यशवंतभाऊ भोसले, पाटीलबुवा चिंचवडे, विठ्ठल भोईर, हेमंत डांगे, अंबर चिंचवडे, शेखर चिंचवडे, अजित कुलथे, कैलास सानप, मनोज ब्राह्मणकर, मधुकर बच्चे, रविंद्र देशपांडे, राजेंद्र चिंचवडे, विठ्ठलभाऊ सायकर, सागर चिंचवडे, महेश लांडगे, राहुल भोईर, बाळासाहेब लोंढे, सोपान चिंचवडे, आवेश चिंचवडे, चेतन चिंचवडे, दीपक गावडे, नानिक पंजाबी, स्वप्निल शेडगे, नंदूकाका भोगले आदी मान्यवर उपस्थित होते.
🎤 सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रदीप बेंद्रे यांनी केले.
