29.3 C
New Delhi
Thursday, July 23, 2026
Homeताज्या बातम्यास्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशनच्या वतीने

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशन, हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील सारसबाग येथील वीर सावरकरांच्या पुतळ्यास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

या वेळी प्रखर हिंदुत्ववादी व सावरकरांच्या विचारांचे पाईक असणारे अ‍ॅडव्होकेट व सीए  सर्वेश मेहेंदळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास  प्रशांत टिकार, फाउंडेशनचे पदाधिकारी  प्रीतम थोरवे व  नयन ठाकूर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशप्रेम, स्वातंत्र्यासाठीचा त्याग, क्रांतिकारक कार्य व अखंड भारताची संकल्पना यांचा गौरव केला. सावरकरांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून राष्ट्रहितासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत सर्वेश मेहेंदळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
29.3 ° C
29.3 °
29.3 °
66 %
4.5kmh
19 %
Thu
34 °
Fri
36 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
35 °

Most Popular

Recent Comments