25.2 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्याकुंडमळा पुल दुर्घटना: पर्यटनस्थळी निष्काळजी गर्दीचा जीवघेणा परिणाम!

कुंडमळा पुल दुर्घटना: पर्यटनस्थळी निष्काळजी गर्दीचा जीवघेणा परिणाम!

Pune Bridge Accident पुणे | : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंड मळा येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून त्यावर असलेले अनेक पर्यटक नदीत कोसळले. या दुर्घटनेत २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ३८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.

प्रशासनाकडून तात्काळ मदतकार्य राबवण्यात आलं. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, पोलीस आणि महसूल विभागाने बचाव कार्य गतीने सुरू ठेवलं आहे.


📌 दुर्घटनेमागे वजनवाढीचा अंदाज; प्रशासनाचे आदेश धाब्यावर!

सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने पुलावर अतिरिक्त वजन निर्माण झालं होतं. काही पर्यटकांनी दुचाकी उभ्या केल्याने पुलावरचा भार अधिक वाढल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, या पुलावर प्रवेश करण्यास दहा दिवसांपूर्वीच बंदी घालण्यात आली होती. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत अनेक पर्यटक पुलावर गेले आणि दुर्दैव घडलं.

मोफत उपचार आणि ५ लाखांची मदत-दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमी नागरिकांवर मोफत उपचार करण्यात येणार असून, पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रशासनाचा इशारा – आदेश झुगारणाऱ्यांवर कारवाई होणार-ही दुर्घटना न झालेली असती, जर लोकांनी प्रशासनाचे आदेश पाळले असते. जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केलं आहे की, पर्यटनस्थळी प्रशासनाच्या सूचना वाचाव्यात आणि काटेकोरपणे पाळाव्यात. या घटनेनंतर पुलाच्या संरचनात्मक तपासणीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.2 ° C
25.2 °
25.2 °
77 %
4.2kmh
15 %
Sun
29 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!