35.1 C
New Delhi
Saturday, May 9, 2026
Homeदेश-विदेशजनगणना २०२७ तयारीला वेग

जनगणना २०२७ तयारीला वेग

घर यादी गट अचूक नोंदविण्याचे निर्देश

पुणे, – आगामी जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर घर यादी गट नोंद
प्रणालीवरील घर यादी गट नोंदी अचूक ठेवण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत केंद्र सरकारच्या जनगणना संचालनालय, महाराष्ट्र यांच्याकडून पुणे जिल्ह्यासाठी नियुक्त जिल्हा समन्वयक रजत मित्तल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. क्षेत्रस्तरावर मांडणी व भौतिक पडताळणीची कामे अचूकपणे पूर्ण करूनच एच.एल.बी.सी. प्रणालीवर नोंदी कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत जनगणना कार्य संचालनालयाने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग दिला असून, पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी व घरगणना’ हे काम १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्यापूर्वी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यंदाच्या जनगणनेत सर्व नोंदवही (ग्रामीण, शहर व चार्ज नोंदवही) डिजिटल प्रणालीद्वारे तयार करण्यात येणार असून, यामध्ये स्थानविषयक माहिती पूर्वभरलेली असणार आहे. चार्ज नोंदवहीमध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या कामाचे वाटप, प्रशिक्षण भत्ता व मानधनाची माहिती नोंदविण्यात येणार आहे.
घर यादी गट नोंदणी करताना प्रत्यक्ष क्षेत्रातील स्थिती आणि एच.एल.बी.सी. प्रणालीवरील माहिती यामध्ये शंभर टक्के सुसंगती राखणे अत्यावश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यासाठी सर्व चार्ज अधिकाऱ्यांनी व प्रगणना समन्वयकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच, घर यादी गट निश्चित करताना संबंधित वस्तीची लोकसंख्या किमान ८०० असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

ग्रामीण भागात तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी हे चार्ज अधिकारी म्हणून काम पाहणार असून, शहरी भागात मुख्याधिकारी किंवा संबंधित आयुक्त ही जबाबदारी पार पाडणार आहेत. सर्व नोंदवही अंतिम करून स्वाक्षरीसह जनगणना संचालनालयाकडे सादर कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
35.1 ° C
35.1 °
35.1 °
31 %
2.1kmh
20 %
Sat
35 °
Sun
41 °
Mon
44 °
Tue
44 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments